कै.विष्णु बाबु धोत्रे यांच्या स्मरणार्थ २०२३ भव्य निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान “

मोहोळ प्रतिनिधी --
  मौजे-कुरूल ता.मोहोळ येथे कै.विष्णु बाबु धोत्रे यांच्या स्मरणार्थ १७/१२/२०२३ भव्य निकाली कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले होते. या भव्य निकाली कुस्तीसाठी मोहोळ राखीव विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे संभाव्य उमेदवार उद्योजक मा.श्री.राजु खरे यांच्या तर्फे ७१००० हजार रूपयांचे पारितोषिक लावण्यात आले. सदर स्पर्धाची कुस्ती उद्योजक मा.श्री.राजु खरे यांच्या मार्फत लावण्यात आली.सदर कुस्ती स्पर्धेसाठी उपस्थित राहिल्याबद्दल मा.श्री.राजु खरे साहेब यांचा फेटा व पुष्पगुच्छ देऊन स्वागतपर सत्कार करण्यात आला.
     या कुस्ती स्पर्धेसाठी माजी नगराध्यक्ष न.प.पंढरपुर मा.वामन(तात्या) बंदपट्टे,वस्ताद पै.बाळासाहेब चवरे,मोहोळ विधानसभा मतदारसंघ संपर्क प्रमुख मा.प्रकाश(दादा)पारवे,बेगमपुर सरपंच मा.प्रकाश सपाटे,युवा नेते मा.गणेश जाधव,मा.रंगनाथ गुरव,उत्तर सोलापूर तालुका उपप्रमुख मा.उमाकांत करंडे,मोहोळ तालुका उपप्रमुख मा.अमर सोनवले,मा.चंदनशिवे सर,मा.लखन वाघमारे,मा.निखील गायकवाड,मा.आतिश सावंत,मा.नोमिनाथ शिरसट व समस्त कुरुल ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form