पंढरपूर (प्रतिनिधी):
तुंगत येथे दि २२ डिसेंबर रोजी प्रसिद्ध व्याख्याते श्री वसंत हंकारे यांचे " बाप समजावून घेताना चला जगूया आनंदाने " या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले असल्याची माहिती तुंगत ग्रामपंचायत माजी उपसरपंच पंकज लामकाने यांनी दिली.
तुंगतच्या लोकनियुक्त सरपंच डाॅ. अमृता रणदिवे यांचे संकल्पनेतून मि.सरपंच डाॅ.आबासाहेब रणदिवे यांचे वाढदिवसाचे औचित्य साधून या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.सध्याचे युग हे सोशल मीडिया मोबाईल टेलिव्हिजनचे आहे यामुळे किशोरवयीन मुलींच्या मनावर विचित्र परिणाम होत आहे चौकाचौकांनी, शाळा, क्लासेस, कॉलेज समोर टवाळखोर रोड रोमिओ मुलींचा पाठलाग करत असताना आपण नेहमी पाहतो आणि म्हणूनच यावर एकमेव उपाय म्हणजे आपल्या मुलींचे प्रबोधन होणे गरजेचे आहे. जेव्हा मुली मनोमन विचार आत्मसात करतील तेव्हा समाजातील चित्र बदलेल आणि निश्चितच आई-वडिलांना मनस्ताप देणे तसेच अनुचित प्रकार कुठेतरी थांबेल या हेतूने महिला व मुलींचे समुपदेशन काळाची गरज यामुळेच प्रसिद्ध व्याख्याते तथा समाज प्रबोधनकार वसंत हंकारे सांगली यांच्या व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवार 22 डिसेंबर रोजी सायं ६ ते ९ पर्यंत येथील ग्रामपंचायत कार्यालय परिसरात करण्यात आले आहे. बाप या व्यक्तीबद्दलचे मत हंकारे हे छान मांडतात, प्रामुख्याने व्याख्यान ऐकल्यानंतर भविष्यात मुली चुकीचा निर्णय घेणे नक्की टाळतील आणि त्यामुळे बाप नावाचा व्यक्ती कायम ताठ मानेने समाजापुढे जगेल. तसेच आनंदाने जगण्यासाठी उत्तम मार्गदर्शन हंकारे करतात. तुंगत सारख्या ग्रामीण भागात या व्याख्यानाचे आयोजन होणार असून किशोरवयीन मुलींना घेऊन विशेष करून माता पालकांनी या कार्यक्रमाला अवश्य उपस्थित रहावे असे आवाहन आयोजक डॉ. आबासाहेब रणदिवे आणि लामकाने यांनी केले आहे.
Tags
सामाजिक वार्ता