फलटणच्या आर टी ओ कार्यालयासाठी खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर आगृही...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेकडून हिरवा कंदील....
पंढरपूर/प्रतिनीधी 
फलटण भागातील लोकांची गैरसोय दूर व्हावी यासाठी याठिकाणी स्वतंत्र आर टी ओ कार्यालय व्हावे यासाठी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर आगृही झाले आहेत. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन  परिवहन कार्यालय सुरू व्हावे अशी मागणी केली आहे.

 याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विशेष बाब म्हणून परवानगी देण्यात यावी ,असे आदेश संबंधित विभागास दिलेले आहेत . फलटण येथे परिवहन कार्यालय सुरू झाल्यास फलटण मधील सर्वसामान्य लोकांना लायसन काढण्यासाठी व इतर कामासाठी साताराला जावे लागणार नाही .आता आर टी ओ कामासाठी सातारा येथे जावं लागत आहे. फलटणच्या शेवटच्या टोकापासून  हे अंतर कमीत कमी 100 किलोमीटर आहे . त्यामुळे लोकांचे खुप हाल होत आहे व आर्थिक त्रास  सोसावा लागत आहे .फलटणला  परिवहन कार्यालय झाल्यास फलटणमधील सर्वसामान्य लोकांना याची सोय होणार आहे यामुळे शहरातली युवक व्यापारी यांचा दिवस वाया जाणार नाही व खर्चामध्येही कपात होईल.  स्वतंत्र आरटीओ नंबर फलटण तालुक्याला मिळेल . या कार्यालयाचा प्रश्न मिटणार असल्याने सर्वसामान्य जनतेमध्ये खूप आनंदाचे  वातावरण आहे .

     खा. रणजितसिह नाईक निंबाळकर यांनी मुख्यमंत्री  शिंदे यांना दिलेल्या पत्रामध्ये आरटीओ कार्यालयास सरकारी जागा उपलब्ध व्हावी, अशीही मागणी त्यामध्ये केलेली आहे. त्यासाठीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे लवकरच प्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू होण्यास अडचण राहणार नाही. अशी माहिती खा. नाईक निंबाळकर यांच्या वतीने देण्यात आली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form