पंढरपूर नगरपालिका जुलमी करवाढ विरोधात सह्यांची मोहीम....

महाविकास आघाडीच्या वतीने अभिजित पाटील यांच्या माध्यमातून शहरात ३० ठिकाणी सह्यांची मोहीम...
(छत्रपती शिवाजी महाराज चौक पंढरपूर)
पंढरपूर प्रतिनिधी -  
पंढरपूर नगर परिषद पंढरपूर यांनी पंढरपूर शहरातील नागरिकांची व मालमत्ता धारकांची भरमसाठ केलेली करवाढ याचा पंढरपूर शहरातील जनतेतून तीव्र विरोध होत असून त्यासाठी नगरपरिषदेने घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात करवाढ रद्द करावी यासाठी नगर परिषदेच्या विरोधात सह्यांची मोहीम आजपासून सुरू करण्यात आली ही मोहीम पंढरपूर शहरात महाविकास आघाडीच्या वतीने  अभिजीत आबा पाटील चेअरमन श्री विठ्ठल सहकारी सहकारी साखर कारखाना वेणूनगर,गुरसाळे ता.पंढरपूर यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज चौक पंढरपूर येथे राबविण्यात येत आहे.तसेच पंढरपूर येथील ३० ठिकाणी या सह्यांची सुरू केली आहे. पंढरपूर नगरपरिषदेच्या विरोधात पंढरपूरच्या जनतेत असलेला रोष शासनापर्यंत पोहोचवण्याचा हा लोकशाही मार्ग अवलंबण्यात येत आहे अशी माहिती महाविकास आघाडीच्या वतीने देण्यात आली आहे.
(सरगम चौक, पंढरपूर शहर राष्ट्रवादी कार्यालय)
पंढरपूर नगरपालिका क्षेत्रातील मालमत्ता धारकांच्या नवीन करनिर्धारणाच्या२०२३-२४ ते २०२७-२८ नोटीसा वाटप करण्याचे काम सध्या नगरपालिकेच्या वतीने चालू आहे.त्या नोटीसीस उत्तर देण्यासाठी १२ डिसेंबर २०२३ ही मुदत देण्यात आलेली आहे. अद्यापही नोटीस बजावण्याचे काम चालू आहे. देण्यात आलेल्या नोटीसीमध्ये जाहीर प्रसिद्धीकरण केल्याच्या तारखेपासून ३० दिवसाच्या आत आपले म्हणणे लेखी स्वरुपात द्यावे असे सूचित करण्यात आलेले आहे.

तसेच आकारणीची पध्दत घेतलेले मोजमाप याची माहितीघेण्यासाठी नगरपालिकेच्या कार्यालयात समक्ष यावे असेही सुचित केले आहे. सदर करवाढीची नोटीस प्रसिद्धीकरण करण्याची तारीख १३ नोव्हेंबर दिवाळीमध्ये आणि आक्षेप घेण्याची मुदत १२ डिसेंबरपर्यंत म्हणजे शहरातील नागरिकांना व करदात्यांना केवळ बारा दिवसांचा कालावधी या नोटिशीस उत्तर देण्यासाठी उपलब्ध होत आहे. म्हणजेच याकरिता त्यांना पुरेसा कालावधी मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे. वास्तविक दिवाळीचा कालावधी व त्यानंतर होणारी कार्तिकी यात्रा हा कालावधी वगळून नंतरही किंवा दिवाळीपूर्वी एक महिना सूचना प्रसिद्ध करता आली असती व येथील करदात्यांना कायदेशीररित्या आक्षेप घेण्यासाठी ३० दिवसांची मुदत उपलब्ध करून देता आली नाही म्हणजेच येथील नागरिकांना आक्षेप तक्रारी नोंदवण्यासाठी पुरेसा वेळ मिळू नये ही बाब नगरपालिकेने विचारात घेतली की नाही अशी शंका येते.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form