अनाथ’ मुलांना आता ‘स्वनाथ’ बनविणे आवश्यक---सौ.श्रेया भारतीय

                                                  पंढरपूर प्रतिनिधी--
ज्या युवकांना समाजासाठी काहीतरी करायचे आहे त्यांनी १८ वर्षानंतर म्हणजे सज्ञान झाल्यानंतर घर सोडून आपल्या मनगटाच्या बळावर कार्य करण्याची आवश्यकता आहे. आज विविध कारणांमुळे  समाजात अनाथ मुलांचे प्रमाण वाढत आहे. आई-वडिलांच्या मायेपासून वंचित राहिलेली अशी जी अनाथ मुले आहेत त्यांना आधार देणे अतिशय गरजेचे आहे. अशा अनाथ मुलांना आपुलकी, माया, ममता, प्रेम देणे गरजेचे आहे असे आवाहन पंढरपूर येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट अंतर्गत असलेल्या अभियांत्रिकी व फार्मसीच्या (पदवी व पदविका) या चारही महाविद्यालयात आयोजिलेल्या या प्रेरणादायी मार्गदर्शन सत्रात ‘स्वनाथ फाऊंडेशन’च्या संस्थापिका व व्यवस्थापकीय संचालिका सौ. श्रेया भारतीय यांनी केले.

   ‘अनाथ’ मुलांना आधार देण्यासाठी ‘स्वनाथ फाउंडेशन’ची निर्मिती केली असून  अनाथ मुलांनची काळजी आणि संरक्षणाची गरज आहे ते त्यांना दिले गेले पाहिजे. अनाथ मुलांना प्रेम मिळाले तर ते मुळीच अनाथ राहणार नाहीत. आपण सर्वजण आपल्या आयुष्यात 'अनाथ मुलांना स्वनाथ बनवूया' असा संकल्प करा.’ असे आवाहन स्वनाथ फाऊंडेशनच्या संस्थापिका व व्यवस्थापकीय संचालिका सौ. श्रेया भारतीय यांनी केले.
         
  
  स्वेरीच्या शैक्षणिक क्षेत्रातील  कार्याचा गौरव म्हणून स्वनाथ फाऊंडेशनच्या संस्थापिका व व्यवस्थापकीय संचालिका सौ. श्रेया भारतीय यांनी स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांचा स्वनाथ फाऊंडेशन तर्फे स्मृतिचिन्ह देऊन गौरव केला. 

यावेळी पंढरपूर अर्बन बँकेच्या व्हाईस चेअरमन सौ. माधुरी जोशी, सौ. मानसी साठे तसेच स्वेरीचे युवा विश्वस्त प्रा.सुरज रोंगे, बी. फार्मसीचे प्राचार्य डॉ.मिथुन मणियार, डिप्लोमा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.एन. डी. मिसाळ, डी. फार्मसीचे प्राचार्य प्रा. सतिश मांडवे यांच्यासह अधिष्ठाता, प्राध्यापक व चारही महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते. सांस्कृतिक कार्यक्रमाचे विभागप्रमुख डॉ.यशपाल खेडकर यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form