पंढरपूर मराठा कुणबी समाज जातीच्या नोंदी तपासणी सुरु --- तहसिलदार सुशील बेल्हेकर

तीन मंडल अधिकारी 10 तलाठी 20 कोतवाल यांची नियुक्ती
पंढरपूर प्रतिनिधी----
 राज्य शासनाच्या सूचनेनुसार व जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या आदेशान्वये मराठा कुणबी समाज जातीच्या नोंदी तपासणीचे कामकाज तहसील कार्यालय, पंढरपूर येथे सुरु करण्यात आले असल्याची माहिती तहसिलदार सुशील बेल्हेकर यांनी दिली.

पंढरपूर तहसील कार्यालय अंतर्गत असणार्‍या एकूण 95 गावच्या सन 1900 ते 1950 या कालावधीतील जन्म- मृत्यू नोंदवहया तपासणीचे कामकाज सुरु करण्यात आले आहे. तहसील कार्यालयाच्यावतीने यासाठी 3 मंडल अधिकारी, 10 तलाठी, 20 कोतवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मराठा कुणबी समाज जातीच्या नोंदीची माहिती गावनिहाय संकलित करून त्याचे स्कॅनिंग करण्यात येणार आहे. मराठा कुणबी समाज जातीच्या नोंदीची माहिती संबंधित ग्रामस्थांना पीडीएफद्वारे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जेणेकरून त्यांना कुणबी जात प्रमाणपत्र मिळणे सोयीस्कर होणार आहे.
      तसेच नागरिकांना प्रशासनातर्फे आवाहन करण्यात येत आहे की, त्यांच्याकडे ज्या काही नोंदी असतील. त्या तहसील कार्यालय पंढरपूर मध्ये सादर कराव्यात. जेणेकरून त्या नोंदीनुसार कार्यालयात शोध घेता येईल.असे नायब तहसिलदार मनोज श्रोत्री यांनी सांगीतले.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form