पंढरपूर तहसील कार्यालयावर मोर्चा काढून केले आंदोलन
पंढरपूर/प्रतिनिधी
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आता आरपीआय आठवले गट मैदानात उतरला असून पंढरपूर तहसील कार्यालयावर बुधवारी मोर्चा काढून मराठा आरक्षण आंदोलनासाठी बसलेल्या आंदोलकांना आरपीआय आठवले गटाच्या वतीने पाठिंबा देण्यात आला.
यावेळी एस.सी,एस.टी व ओ.बी.सी. या घटकाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी मागणी करण्यात आली.
यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पंढरपूर शहर व तालुक्याच्या वतीने तहसिल कार्यालय, पंढरपूर येथे आंदोलन करण्यात आले.
यावेळी प्रदेश सचिव सुनिल सर्वगोड, महा.प्रदेश सदस्य आबासाहेब दैठणकर, प.महा.सरचिटणीस जितेंद्र बनसोडे, जिल्हा उपाध्यक्ष अरविंद कांबळे, शहराध्यक्ष, ॲड.किर्तीपाल सर्वगोड, तालुकाध्यक्ष संतोष पवार, शहर सरचिटणीस सचिन गाडे, शहर कार्याध्यक्ष विजय खरे, युवक शहराध्यक्ष विशाल मांदळे, तालुका सरचिटणीस दयानंद बाबर, तालुका कार्याध्यक्ष सचिन भोसले, शाहू सर्वगोड, पोपट क्षिरसागर,राजू ढवळे, सुखदेव माने, राजकुमार भोपळे, दत्ता वाघमारे, समाधान आठवले, युवक उपाध्यक्ष अक्षय कदम, रुपेश वाघमारे, अविनाश आवचारे, अतिश हाडमोडे, ॲड.गौतम भालेराव बापू खिलारे, ॲड.रोहित एकमल्ली, संदेश माने, अजिंक्य ओहाळ, सूरज साखरे, उमेश सर्वगोड, आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.
Tags
सामाजिक वार्ता