जिल्ह्यातील वायुसेनेतील माजी सैनिकांची परिवारासह उपस्थिती
सांगोला प्रतिनिधी :-
सोलापूर जिल्ह्यातील वायुसेनेतील माजी सैनिकांचा मंगळवेढा येथे ९१ वा एयर फोर्स डे साजरा करण्यात आला.हा असा आगळावेगळा कार्यक्रम गेले ९१ वर्षात सोलापूर जिल्ह्यातील माजी सैनिक व त्यांचे परिवार यांना पहिल्यांदाच पाहायला मिळाले त्यासाठी गोपीनाथ माळी साहेब व त्यांची पूर्ण टीम मंगळवेढा तालुक्यातील एयर फोर्स चे माजी सैनिक, पंढरपूर येथील सैनिक, सांगोला तसेच सोलापूर जिल्ह्यातील माजी सैनिकांनी सहकार्य केले.
यावेळी भारतीय माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष व महाराष्ट्र राज्य वरिष्ठ उपाध्यक्ष तसेच राष्ट्रीय संचालक अरुण कुमार तळीखेडे यांनी माजी सैनिकांना संबोधित करताना जास्तीत जास्त माजी सैनिकांनी एकत्रित येऊन संघटनेला मजबूत करावे असे आवाहन केले . तसेच संगीत खुर्ची,निंबू चमचा रेस, अशा अनेक मनोरंजक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते त्यांच्या आनंद घेवून सर्व परिवारा बरोबर स्वादिष्ट आशा भोजनाचा आस्वाद घेवून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी अरुण कुमार तळीखेडे यांनी एयर फोर्स डे निमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या.
Tags
सामाजिक वार्ता