आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची कर्जयोजना बँकेने स्विकारली आहे याचा मराठा समाजातील उद्योजक तरुणांनी लाभ घ्यावा --अध्यक्ष सोमनाथ डोंबे
पंढरपूर प्रतिनिधी---
दि पंढरपूर मर्चंट्स को-ऑप. बँक लि., पंढरपूर शाखा करकंब येथे शुक्रवार दि ६ ऑक्टोंबर २०२३ रोजी ग्राहकांच्या सेवेसाठी नविन लॉकर व क्यू आर कोड सेवेचा शुभारंभ बँकेचे अध्यक्ष सोमनाथ डोंबे यांच्या हस्ते संपन्न झाला.
अध्यक्षीय भाषणात बोलताना अध्यक्ष डोंबे यांनी करकंब शाखेच्या आर्थिक प्रगतीचा आलेख वाचुन दाखविला. तसेच करकंब शाखेच्या सातत्याने होणाऱ्या प्रगतीबाबत सभासद, ठेवीदार, कर्जदार, खातेदार यांच्याच सहकार्यामुळे प्रगती साधता आली असे नमूद केले. मराठा समाजातील होतकरू तरुणांसाठी आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची कर्जयोजना बँकेने स्वीकारलेली असुन त्याचा मराठा समाजातील उद्योजक तरुणांनी जास्तीत जास्त लाभ घेऊन आपली आर्थिक प्रगती साधावी असे सांगितले. यापुढेही बँक खातेदारांना अजून चांगल्या सेवा सुविधा देण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सांगितले. करकंबवासीयांच्या सेवेसाठी एटीएम सेवा देणेचा मानस त्यांनी बोलून दाखविला.
यावेळी बँकेचे उपाध्यक्ष विजयकुमार कोठारी, संचालक नागेश भोसले,शितल तंबोली, भगीरथ म्हमाने, अमरजित पाटील, बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या अध्यक्षा व संचालिका सौ.मंजुश्री भोसले, सौ. सुनंदा गांधी, तज्ञ संचालक मारुती देशमुख उपस्थित होते. संचालक आदित्य फत्तेपुरकर यांनी बँक देत असलेल्या विविध कर्ज योजनेची माहिती सांगितली. त्याप्रसंगी बोर्ड ऑफ मॅनेजमेंट सदस्य अॅड.प्रमोद मोहिते,शाम गोगाव, प्रा. राजेंद्र मोरे, शाखा सल्लागार राजेश शहा, बागवान, ॲड.शरदचंद्र पांढरे, लक्ष्मण कुंभार, शंकर राऊत व बहुसंखेने सभासद, ग्राहक उपस्थित होते.मुस्तफा दस्तगीर बागवान, ऍड शरदचंद्र पांढरे, लक्ष्मण नलवडे, औदुंबर कुंभार, शंकर राऊत, व बहुसंख्येने सभासद,ग्राहक,ठेवीदार, कर्जदार, हितचिंतक उपस्थित होते.
सर्व उपस्थितांचे बँकेचे व्यवस्थापक अतुल म्हमाने यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी उपव्यवस्थापक रमेश कुलकर्णी, ईडीपी प्रमुख मोहन मोहिते, वसुली अधिकारी ज्ञानेश्वर पोरे, शाखाधिकारी सिद्धेश्वर कस्तुरे व शाखा कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
Tags
सहकार वार्ता