पंढरीत महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्ता मेळावा संपन्न

ग्रामपंचायतपासून ते लोकसभेपर्यंतच्या सर्व निवडणुका स्वबळावर लढवणार : संजय सोनवणे
पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता हा आर्थिक द्रष्ट्या सक्षम झाला पाहिजे : संजय सोनवणे
पंढरपूर/प्रतिनिधी 
महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्ता मेळावा पंढरपूर येथील शेठ मोरारजी कानजी सभागृहात संपन्न झाला.
या कार्यकर्ता मेळाव्यासाठी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक अध्यक्ष संजय सोनवणे उपस्थित होते. 
मेळाव्याच्या सुरुवातीस पंढरपूर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर,छत्रपती शिवाजी महाराज,राष्ट्रमाता जिजाऊ,पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पन करून अभिवादन करण्यात आले.
कार्यकर्ता मेळाव्यास सुरुवात होण्यापूर्वी अनेक मान्यवरांकडून व विविध संघटनांकडून संजय सोनवणे यांचा सन्मान करण्यात आला. 
या कार्यकर्ता मेळाव्यात विवीध पक्षातील व संघटनातील शेकडो कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षात प्रवेश केला.
यावेळी पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
शेवटी अध्यक्षीय भाषणात महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष संस्थापक अध्यक्ष संजय सोनवणे यांनी कार्यकर्त्यांची जबाबदारी काय असते,कार्यकर्त्यांची भूमिका काय असते ,कार्यकर्ता कसा असावा,इत्यादीं बाबींवर सोनवणे यांनी आपले मत व्यक्त केले.
आपल्या पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता हा आर्थिक द्रष्ट्या सक्षम झाला पाहिजे ,तो घेणारा नाहीतर देणारा झाला पाहिजे,कार्यकर्त्याने कोणतेही व्यसन केले नाही पाहिजे,खोटे नाही बोलले पाहिजे,तसेच कोणतेही काम करण्यापूर्वी आंदोलन करण्यापूर्वी प्रत्येक कार्यकर्त्यानी खरे काय खोटे काय याची पूर्ण शहानिशा केली पाहिजे,तसेच आपल्या पक्षाच्या व पदाच्या माध्यमातून शेतकरी,कष्टकरी,मजूर,शेतमजूर,अन्यायग्रस्तगोरगरीब व दीनदलितांची कामे केली पाहिजेत,पक्षांतर्गत कोणतीही गटबाजी न करता आपापले काम प्रामाणिकपणाने व सातत्याने केले पाहिजे.तसेच महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षात काम करताना कार्यकर्त्याना आवश्यक ती मदत व पाठबळ व त्यांच्या समस्यांचे निराकरण कायद्याच्या चौकटीत राहून केली जाईल.एकही कार्यकर्ता लाभापासून वंचित राहणार नाही,परंतु प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या कामाची छाप दाखविली पाहिजे.किंवा पक्षासाठी आपले किमान योगदान तर दिले पाहिजेत अशी अपेक्षा सोनवणे यांनी यावेळी व्यक्त केला.
यापूर्वी भंडीशेगाव मध्ये व इंदापूर,माढा,पंढरपुर तालुक्यातील कार्यकर्त्याना १४ बोलेरो पिकअपचे वाटप करण्यात आले. 
भाषणाच्या शेवटी  सोनवणे यांनी  आपल्या पक्षातील सर्व  पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना आगामी काळातील सर्व निवडणूका स्वबळावर ग्रामपंचायतपासून ते लोकसभेपर्यंत लढविण्याच्या व त्यासाठी जोरदार तयारी करण्याच्या सूचना दिल्या. पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना विधानसभेच्या कमी फरकाने निवडून येणाऱ्या जागांवर विशेष लक्ष देऊन व त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात मोर्चेबांधणी करण्याच्या सूचना दिल्या व आपल्या भाषणाचा समारोप केला.

महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या या कार्यकर्ता मेळाव्यानंतर सर्व प्रस्थापित पक्षांमध्ये व विविध संघटनांमध्ये विचारमंथन सुरू झाले आहे .तसेच महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाला मिळत असलेल्या सर्वसामान्य जनतेच्या व कार्यकर्त्याच्या मोठ्या पाठिंब्यामुळे व प्रतिसादामुळे आगामी काळातील सर्व निवडणुकीत आपणाला फार मोठी कसरत करावी लागेल व त्यासाठी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचा जरूर विचार करावाच लागेल अशी चर्चा सुरू आहे.
त्यामुळे महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचा हा कार्यकर्ता मेळावा संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात व पंढरपूर तालुक्यातील राजकारणात व समाजकारणात मोठी कामगिरी व उलथापालथ करेल यात शंका नाही,कारण महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या स्वरूपात जनतेला निष्क्रीय प्रस्थापितांविरुद्ध एक सक्रीय व सक्षम पर्याय मिळाला आहे.या कार्यक्रमासाठी पुणे व सोलापुर जिल्ह्यातील सर्व नेते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form