सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून पंढरपूर अधिवक्ता संघाच्या वतीने निवेदन

पंढरपूर प्रतिनिधी---
सकल मराठा समाजास आरक्षण द्यावे या मागणीसाठी पंढरपूर अधिवक्ता संघाचे वतीने आज अप्पर तहसीलदार मनोज क्षोत्री यांना निवेदन देण्यात आले.
अंतरवाली सराटी ता. अंबड जि. जालना येथे मराठा आरक्षण मिळणेबाबत आमरण उपोषण  मनोज जरांगे पाटील यांचे सनदशीर मार्गाने सुरू आहे यास पंढरपूर अधिवक्ता संघाच्या वतीने पाठींबा देण्यात आला आहे .
सनदशिर मार्गाने व घटनात्मक मागनि सुरू असलेल्या आदोलनास पंढरपूर अधिवक्ता संघाचा पाठींबा असून सदर आंदोलनाची दखल घेत शासनाने सदर मागणीबाबत त्वरीत योग्य तो घटनात्मक दृष्टया निर्णय घ्यावा असे निवेदन अधिवक्ता संघाचे वतीने  देण्यात आले.
सदर निवेदन पंढरपूर येथील तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केलेले श्री. गणेश जाधव यांच्या उपस्थितीत देण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form