शिंपी समाजाच्या वतीने भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांना दिले विविध मागण्याचे निवेदन

मुंबई प्रतिनिधी----
शिंपी समाजाच्या शिष्टमंडळास भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे ठोस आश्वासन शिंपी समाजाच्या मागणी पूर्ण करणार व लवकरच मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या बरोबर शिंपी समाज शिष्टमंडळाच्या बैठकीचे आयोजन करणार" असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले आहे.

काल दिनांक 30 ऑक्टोबर सोमवार रोजी मुंबई येथे भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालय येथे भाजप प्रदेशाध्यक्ष मा आ. चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्रातील समस्त शिंपी समाजाच्या पोट जातीच्या प्रमुख नेत्यांची महत्त्वपूर्ण मीटिंग संपन्न झाली या मीटिंगमध्ये शिंपी समाजाच्या प्रलंबित मागण्या विषयादेशाध्यक्ष अॅड. महेश ढवळे यांनी सांगितले की आमच्या मागण्या ह्या रास्त असून शिंपी समाजातील गरीब शिवण काम करणारे गरीब बांधव व सुशिक्षित बेरोजगार युवक तसेच उच्च शिक्षण घेणारे गरीब विद्यार्थी यांच्या उन्नती व प्रगतीसाठीच आमच्या मागण्या असून यात आमची शासनाकडे अनेक वर्षापासून प्रलंबित प्रमुख मागणी अशी आहे कीराष्ट्रीय संत नामदेव महाराज या ची जयंती व पुण्यतिथी शासकीय स्तराव साजरी करावी ही आमची प्रमुख मागणी आहे. या मागणीसाठी महाराष्ट्र विधानसभेत जळगाव शहराचे लोकप्रिय आ. सुरेश दामू भोळे (राजूमामा) यांनी २ वेळा विधानसभेमध्ये हे निवेदन सादर केले हे आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट असून हि मागणी समस्त शिंपी समाज नव्हे तर संपूर्ण वारकरी संप्रदायची सुद्धा आहे असे त्यांनी सांगितले यावर सखोल चर्चा करण्यात आली व प्रदेशाध्यक्ष मा. आ. चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांना शिंपी समाजाच्या वतीने मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आल्यात १५ मागण्या असून या मागण्यांवर पक्षाच्या वतीने व सरकारच्या वतीने पूर्णकरण्याचे तसेच लवकरच मा. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत शिंपी समाजाच्या शिष्ट मंडळी मिटिंग लावण्याचे ठोस आश्वासन दिले. सदर निवेदन अखिल भारतीय क्षत्रिय नामदेव महासंघ महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा. अँड महेश ढवळे, राष्ट्रीय महिला अध्यक्ष सुषमाताई सावळे, माजी अध्यक्ष विजय नाना बिरारी, राज्य संघटक मनोज भांडारकर प्रदेश महिला अध्यक्ष रेखाताई मुळतकर, नामदेव शिंपी समाजाचे किशोर कुमठेकर, व पदाधीकारी छिपा समाजाचे खेमराज नामा वैष्णव शिंपी समाजाचे अविनाश नानोदे, अहिर समाजाचे नाना चव्हाण, रामेश्वर थंडरकर, अशोक जगताप, प्रमोद शिंपी, अनंत पुणेकर, अॅड. सागर मांढरे, मयूर हिरवे, सिद्धेश हिरवे, अशोक शिंपी, मयूर शिंपी, योगेश्वर सोनवणे, सिद्धेश खैरनार, सौ. सोनाल माडगे, सौ. जयश्री माडगे, सौ. अरुणा बिरारी, अॅड. मीनल सोनवणे तसेच भावसार शिंपी समाजाचे महेंद्रभ पतंगे व दर्जी, जैन, माहेश्वरी, मारवाडी, समाजाचे प्रतिनिधी सुद्धा मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form