करकंब येथील मौलाना आझाद न्यू इंग्लिश स्कूल व मदरसा मध्ये विद्यार्थ्यासह शिक्षकांनाही अन्नातून विषबाधा...!

मुख्याध्यापकसह संस्थापकावर गुन्हा दाखल
करकंब  प्रतिनिधी:-
करकंब येथील मौलाना आझाद  न्यू इंग्लिश स्कूल करकंब व आरमी मदरसा मध्ये 29 विद्यार्थ्यासह व दोन शिक्षकांना  शिळ्या अन्नातून विषबाधा झाल्याने करकंब येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या घटनेने करकंब व  परिसरातील शिक्षण क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे. 
     याबाबत सविस्तर पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, करकंब येथील मौलाना आझाद न्यू इंग्लिश स्कूल करकंब. व आरमी मदरसा मधील मधील विद्यार्थ्यांना आणि शिक्षक यांना  दिनांक -१० रोजी शिळे अन्न दिले. व  या शिळ्या अन्नातून मौलाना आझाद येथील शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सात विद्यार्थी, मदरसातील विद्यार्थी तसेच दोन शिक्षकांना विषबाधा झाल्याने झाल्याने रात्रीपासून दिनांक-१० रोजी रात्रीपासून उलट्या व जुलाब सुरू झाल्याने  या सर्वांना दिनांक-११ रोजी करकंब येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
      29 विद्यार्थ्यासह दोन शिक्षकांना अन्नातून  विषबाधा झाल्याने करकंब पोलीस ठाण्यात ठाण्यात कलम 336 ,337, 34 ,31 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.     
     याबाबतची  फिर्याद केंद्रप्रमुख रविकिरण वेळापूरकर यांनी दिली असून  मौलाना आझाद न्यू इंग्लिश स्कूल करकंब  चे मुख्याध्यापक सादिक शौकत पटेल  व आरमी मदरसा चे  संस्थापक शौकत आदम पटेल यांच्यावर करकंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सहाय्यक निलेश तारू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हे. आर. आर. जाधव हे करीत आहेत.
       अशा घटनेमुळे  करकंब व परिसरातील  जिल्हा परिषद अंतर्गत असलेल्या शिक्षणाचा नमुना पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असल्याचे ग्रामस्थातून बोलले जात आहे. त्यामुळे पालक वर्गातून चिंता व्यक्त केली जात आहे.

*चौकट*
    या घटनेची माहिती समजताचं करकंब पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश तारू हे तातडीने करकंब ग्रामीण रुग्णालयात जाऊन रुग्णांची चौकशी करून पुढील उपचारासाठी संबंधित डॉक्टरांशी चर्चा करून तसेच इतर विभागांनाही तत्काळ सूचना केली.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form