नंदेश्वर येथे श्री बाळकृष्ण माऊलींच्या पुण्यतिथी सप्ताह सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रम


नंदेश्वर (प्रतिनिधी) : 
नंदेश्वर (ता. मंगळवेढा) येथे श्री बाळकृष्ण माऊली अध्यात्म ज्ञान मंदिरात श्री बाळकृष्ण माऊलींच्या पुण्यतिथी सप्ताह सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती श्री माऊली सेवा मंडळाच्या वतीने देण्यात आली .

गुरुवार दि. १९ ऑक्टोंबर ते सोमवार दि. २३ ऑक्टोंबर या पाच दिवसांच्या काळात व पुण्यतिथी सप्ताह सोहळा संपन्न होणार आहे. गुरुवार दि. १९ रोजी पहाटे पाच ते सहा या वेळेत प्रभात फेरी होऊन मठाधिपती - बाळासाहेब महाराज यांचे हस्ते विणापूजन तसेच ग्रंथराज श्री दासबोध व श्री बाळकृष्ण चरित्रामृत ग्रंथाचे पुजन होवून अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ होईल. रविवार दि. २२ रोजी पहाटे ५ वाजता नंदेश्वर येथील भाविक भक्त श्रीक्षेत्र इंचगिरी येथे नामज्योत आणण्यासाठी रवाना होतील. इंचगिरी येथे नामज्योत आणण्यासाठी गेलेले भाविक रविवारी दुपारी चार वाजता श्रीक्षेत्र नंदेश्वर येथे येथील व यानंतर श्री बाळकृष्ण माऊलींच्या पालखीची भव्य अशी मिरवणूक निघेल. सोमवार दि. २३ रोजी सकाळी ९ वाजता संगीत भजनास प्रारंभ होईल. यानंतर सकाळी अकरा वाजता
मठाधीपती बाळासाहेब महाराज यांच्या सुश्राव्य अशा प्रवचनास सुरुवात होईल. यानंतर दुपारी १२ वाजता पुष्पवृष्टी होऊन महाप्रसादानंतर या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता करण्यात येईल.

सप्ताह काळात पहाटे  ४ ते ५ या वेळेत काकडा आरती, ५ ते ६ वाजता प्रभात फेरी, सकाळी ७ ते ८ श्रींची महापुजा, ८ ते ९ वा. श्री भागवत वाचन व ध्यान, सकाळी ९ ते १० यावेळेस  संगीत भजन, १० ते १२ वाजता प्रवचन व दुपारची आरती, दुपारी ३ ते ६ वाजता प्रवचन, परमार्थिक व्याख्यान व भजन, सायंकाळी ६ वाजता सायंकाळची आरती, रात्री ७ ते ८ वा. श्री भागवत वाचन व ध्यान, रात्री ८ ते १० वाजता संगीत भजन, रात्री १० ते १२ वाजता कीर्तन, प्रवचन व बारा अभंग असे धार्मिक कार्यक्रम होतील.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form