मंगलमय वातावरणात बाप्पाला निरोप देण्यासाठी पंढरीतील गणेश भक्त सज्ज

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या....
पंढरपूर प्रतिनिधी--
 गेली दहा दिवसांपासून गणपती बाप्पा आपापल्या घरात, सार्वजनिक ठिकाणी, तसेच मंदिरात दररोज उत्साहात आपण सर्वजन मनापासून पूजा नित्य उपचार करीत आहोत तसेच आध्यत्मिक, धार्मिक, सामाजिक आदी उपक्रमांना साजरा करताना बंधुभाव, एकात्मता, सामाजिक सलोखा निर्माण व्हावा यासाठी गणेशोत्सव साजरा केला जातो.
 
याच उत्साहात आज गणरायाला निरोप देण्यासाठी आपल्या हाताची पालखी करून आपल्या लाडक्या बाप्पाला घरातून निरोप देण्यासाठी सहकुटुंब घराबाहेर पडतो तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळही मोठ्या भक्तिभावाने तसेच पारंपारिक पद्धतीने वाजत गाजत बाप्पाला निरोप देण्यासाठी तयारी केली आहे.

यामध्ये प्रामुख्याने लेझीम,झांज,ढोल,ताशा,
हलगी,तुतारी,सनंई,डॉल्बी,मल्लखांब, सामुदायिक नृत्य, आदी विविध प्रकार विविध मंडळे आपली कला सादर करण्यासाठी सज्ज झाली आहेत.यांचा उत्साह द्विगुणित करण्यासाठी विविध राजकीय पक्ष सामाजिक संघटनांनी प्रोत्साहन देण्यासाठी स्वागत मंडप ठेवून त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

पोलिस प्रशासन व नगरपरिषद प्रशासन यांनी गणेश विसर्जन मिरवणूक निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी तयारी केली आहे विविध ठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे तर शहरीत अनेक भागात पर्यावरण पूरक गणेश विसर्जन होण्यासाठी समोपदेशन करण्यात येत आहे तर प्रत्येक भागात गणेश संकलन केंद्र सज्ज ठेवली आहेत.

चंद्रभागा नदी पात्रात गणेश विसर्जन करताना योग्य ती खबरदारी घ्यावी असे प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form