वेदपाठक परिवारांच्या वतीने अक्कलकोट शहरात पांचाळ समाजातील गरजू मुलांचे राज्यस्तरीय मोफत मुंजीचे आयोजन

अक्कलकोट ( प्रतिनिधी ) -  
अक्कलकोट येथील सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार चंद्रकांत रामचंद्र वेदपाठक व वेदपाठक परिवाराच्या वतीने पांचाळ समाजातील सोनार, सुतार, लोहार, मुर्तीकार, तांबड या समाजातील मुलांचे राज्यस्तरीय मोफत मुंजीचे आयोजन करण्यात आले असून दि. ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत पालकांनी आपल्या (बटूचे)
मुलांचे नावे नोंदवावीत असे आवाहन कार्यक्रमाचे यजमान व संयोजक चंद्रकांत वेदपाठक यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.
    
   पांचाळ समाजातील १६ संस्कार, धार्मिक शिक्षणात मौजीबंधन हे एक महत्वाचे संस्कार आहे. मुलांच्या लग्ना अगोदर वयाच्या सातव्या /आठव्या वर्षाच्या आसपास मुलांचे मौजीबंधन संस्कार करणे आवश्यक असते. त्या शिवाय मुलांच्या लग्नाला परवानगी नसते. अनेक कारणामुळे अनेक मुलांची मुंज रखडले गेले असते. याची समाजिक भान व जाणिव ठेऊन चंद्रकांत वेदपाठक व वेदपाठक परिवारांनी यापूर्वीच दि. ८ मे १९९६ रोजी अक्कलकोट येथे १०१ मुलांचे राज्यस्तरीय पांचाळ समाजातील गरीब व गरजू मुलांचे मोफत मुंजीचे धार्मिक शिक्षण व दिक्षा समारंभाचे यशस्वी
आयोजन केले होते. 
  
त्यावेळी सर्वच वर्तमान पत्रानी याची दखल घेऊन त्यास भरपूर प्रसिद्धी दिली होती.
२७ वर्षानंतर पुन्हा एकदा चंद्रकांत वेदपाठक व वेदपाठक परिवार दुसऱ्यांदा पांचाळ समाजातील गरजू मुलांचे राज्यस्तरीय मोफत मुंज (मौजीबंधन) करण्याचे आयोजन केले असून सदर धार्मिक विधी अक्कलकोट येथील एस.टी.स्टँड समोरील श्री मल्लिकार्जून मंगल कार्यालय, येथे रविवार दिनांक ११ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ११.१७ वा. करण्याचे निश्चित केले आहे. मोफत मुंजीच्या कार्यक्रमात सहभागी बटू व त्यांच्या पालकांना कोणतेही अर्थिक खर्च करण्याची आवश्यकता नाही. पालकांनी बटूसह स्वखर्चाने प्रवास करुन अक्कलकोट येण्याचे आहे. बाकीचे संपूर्ण विधीचे खर्च वेदपाठक परिवार करणार आहे. मोफत मुंजीचे धार्मिक विधी, बटूचे मुंजीच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी बटू (मुला) च्या पालकानी आपल्या मुलाची नावे कार्यक्रमाचे यजमान व संयोजक चंद्रकांत वेदपाठक, अक्कलकोट यांचेकडे
(मो.९८५००४८१११) या व्हॉटस् अॅप नंबर वर दि. ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत नावे नोंदवावीत असे आवाहन वजा विनंती विठ्ठल वेदपाठक, सुरेश वेदपाठक, अनिल वेदपाठक यांनी पत्रकार परिषदेत केली आहेत. त्याप्रसंगी राहुल वेदपाठक, आकाश वेदपाठक, सागर वेदपाठक, किरन वेदपाठक, ओंकार वेदपाठक, उदय नरेगल, दिपक पोतदार,आदी हे उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form