विशेष प्रतिनिधी प्रकाश इंगोले
मंगळवेढा ,(पाठखळ)---
जाणीवपूर्वक व खोडसाळ पणे कर्तव्यात कसूर करणारा पाटखळ ग्रामपंचायत चा ग्रामसेवक अरुण मोरे याला तात्काळ निलंबित करावे अशी मागणी दलित अत्याचार विरोधी कृती समितीचे अध्यक्ष डी. के.साखरे यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना केली.दिलीप सावंत व अन्य दलित बांधवांनी पाटखळ ग्रामपंचायत समोर आयोजित केलेल्या आंदोलन स्थळी साखरे बोलत होते.
पाटखळ गावा लगत हिंदू महार समाजाची दफनभूमी व स्मशानभूमी असून ग्रामपंचायत नमुना नंबर आठला भोगवटदार सदरी नोंद करणे आवश्यक असताना सदरच्या जागेमध्येच रस्त्याच्या कडेला गावातील काही व्यक्तीनि मुरूम व लोखंडी अँगल उभारून दांडगाव्याने व बेकायदेशीर अतिक्रमण केले आहे. सदरचे अतिक्रमण हटवण्यात यावे म्हणून सावंत यांनी दि 11 सप्टेंबर 2023 पासून आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबला असताना आंदोलनाच्या सहाव्या दिवशीही ग्रामपंचायत व पंचायत समिती प्रशासनाने त्यांची कसली दखल न घेतल्याने साखरे यांनी निषेध नोंदवला.
ऑक्टोबर 2021 मध्ये गट विकास अधिकारी मंगळवेढा यांनी आदेश देऊन ही संबंधित सरपंच व ग्रामसेवक यांनी त्याकडे दुर्लक्ष केले असल्याचे साखरे यांनी गटविकास अधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिले.
सदर जागेवरील अतिक्रमण तात्काळ हटवून त्या ठिकाणी आंबेडकर उद्यान किंवा संविधान भवन उभारण्याची मागणी केली या वेळी गटविकास अधिकारी शिवाजी पाटील यांच्या उपस्थित सरपंच ऋतुराज बिले यांनी जिल्हाधिकारी सोलापूर यांची परवानगी घेऊन अतिक्रमण काढण्यात येईल असे लेखी पत्र दिल्यानंतर गेल्या सहा दिवसापासून दिलीप सावंत व त्यांच्या सहकार्यानी सुरू केले आमरण उपोषण स्थगित करण्यात आले. यावेळी वंचित बहुजन आघाडी चे तालुका अध्यक्ष अशोक माने,वैशाली सावंत,बाबासाहेब सावंत ,दशरथ सावंत,तुकाराम सावंत,किसन सावंत,गोविंद चुबुकणारायन,शंकर सावंत यांच्यासह बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
Tags
सामाजिक वार्ता