रुक्मिणी विद्यापीठात मंगळागौर स्पर्धेचे आयोजन ....

श्रावणसरी कार्यक्रमांतर्गत शनिवार दिनांक ०९ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता रुक्मिणी विद्यापीठाच्या प्रांगणात 
पंढरपूर प्रतिनिधी ---
१९९२ पासून रूक्मिणी विद्यापीठ महिलांसाठी विविध कार्यक्रम राबवत असते त्याचाच एक भाग म्हणून महिलांना आनंदी जीवन जगता यावे व सतत कौटुंबिक जबाबदारी पारपाडत असणाऱ्या  महिलांना मंगळागौरीच्या निमित्ताने आपल्या मैत्रिणीबरोबर खेळण्याचा ,त्यांच्याशी गप्पा मारण्याचा आनंद घेता यावा.तसेच मनाला चपळता व चैतन्य मिळावे या उद्देशाने संस्था सचिवा  सुनेत्राताई पवार यांचे मार्गदर्शन खाली शनिवार दिनांक ०९ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता रुक्मिणी विद्यापीठाच्या प्रांगणात श्रावणसरी कार्यक्रमांतर्गत मंगळागौर खेळातील स्पर्धेचे आयोजन केलेले आहे .
"चला सखी नो चला, चला जीवन पुष्प उजळाया चला" पंढरीतील रुक्मिणी विद्यापीठ हे समाज परिवर्तनासाठी स्त्री शिक्षणाचा प्रसार, प्रचार व्हावा तसेच स्त्रीयांचे जिवनमान उंचावेल असे कार्य घडवे त्यांना सामाजिक, शैक्षणिक, राजकीय तसेच कौटुंबिक प्रतिष्ठा प्राप्त व्हावी असे महत कार्य रुक्मिणी विद्यापीठ नेहमी करत असते यामध्ये प्रथम , द्वितीय, तृतीय क्रमांक पटकावणार् महिला गटास रोख रक्कम पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
 यासाठी प्रवेश शुल्क म्हणून माफक फी आकारली असून इच्छुकांनी पुढील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा #09175605133
#08390316727
#08379890357
#07028107769 
वर संपर्क करून आपली नाव नोंदणी त्वरित करावी असे संयोजिका सौ. सुप्रियाताई पवार, विभावरी डुबल व सविता लोखंडे यांनी  केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form