पंढरपूर सिंहगड मधील सिव्हिल इंजिनीअरिंग विभागात सी सी प्लस प्लस या विषयावर साप्ताहिक कार्यशाळा संपन्न

पंढरपूर: प्रतिनिधी 
एस के एन सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय पंढरपूर येथील सिव्हिल इंजिनीअरिंग विभागातील तृतीय वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी C, C++ या प्रोग्रामिंग लँग्वेज चे प्रशिक्षण या साप्ताहिक कार्यशाळेत देण्यात आले अशी माहिती विभागप्रमुख डॉ. श्रीगणेश कदम यांनी दिली. या कार्यशाळेत विभागातील ३६ हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला, या कार्यशाळेस तज्ञ मार्गदर्शक म्हणून महाविद्यालयातील कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनीअरिंग विभागातील प्रा. सुमित इंगोले यांचे मार्गदर्शन लाभले अशी माहिती कार्यशाळेचे समन्वयक प्रा गणेश लकडे यांनी दिली.
विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिकांतून शिक्षण घेत नवनिर्मिती करावी असा आग्रह असणाऱ्या प्राचार्य डॉ कैलाश करांडे सरांच्या मार्गदर्शनाखाली असे विविध उपक्रम महाविद्यालयात राबविले जातात.
ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form