श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या वतीने पंढरपूर येथे ऊस पिक परिसंवाद २०२३ संपन्न
पुढील गळीत हंगामापासून एकरी १०० मे. टन ऊसाचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना श्री विठ्ठल पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार
पंढरपूर प्रतिनिधी ---
श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा. श्री अभिजीत धनंजय पाटील यांचे मार्गदर्शनाखाली कारखान्याचे वतीने सदगुरु मंगल कार्यालय, वाखरी, ता. पंढरपूर येथे आज रविवार दि. २३.०७.२०२३ रोजी पहिल्या सत्रामध्ये कृषीरत्न मा. श्री डॉ. संजीवदादा माने ऊस तज्ञ कृषिभूषण व मा. श्री भागवत सरडे तालुका कृषि अधिकारी, मंगळवेढा व मा.श्री सुर्यकांत मोरे, तालुका कृषि अधिकारी, पंढरपूर यांचे उपस्थितीत ऊस पिक परिसंवाद २०२३ संपन्न झाला. याप्रसंगी श्री विठ्ठल प्रतिमेचे पुजन मान्यवरांच्या शुभहस्ते करून कार्यक्रमास सुरूवात झाली. तसेच दुसन्या सत्रामध्ये मा. श्री पंजाबराव डख, हवामान अभ्यासक यांचे हवामान आधारित ऊस शेती यावर व्याख्यान पार पडले.
यावेळी कारखान्याचे चेअरमन श्री अभिजीत (आबा) पाटील म्हणाले की, सुरुवातीपासून आपल्या जिल्ह्यामध्ये पाऊसमान कमी असल्यामुळे ऊस पिकांवर त्याचा परिणाम होवून उत्पादन कमी निघणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. परंतु सध्या आपल्या तालुक्यामध्ये चांगला पाऊसमान होत असल्यामुळे शेतकऱ्यांनी खचून न जाता ऊसाचे वाढीसाठी आपल्याला या परिसंवादामध्ये ऊस तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे योग्य ते खत, पाणी वापरून ऊसाचे उत्पन्नात वाढ कशी होईल याकडे लक्ष दयावे. गतवर्षी महाराष्ट्र राज्यामध्ये साखर कारखान्यामधून साखरेचे कमी उत्पादन झाल्यामुळे अंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये साखरेला मोठ्या प्रमाणावर मागणी वाढलेली आहे. त्यामुळे सध्या साखरेचे दर वाढू लागलेले आहेत. साखरेचे दर वाढल्यामुळे शेतकन्यांना एफ. आर. पी. प्रमाणे बिल देणे कारखान्यांना सोईस्कर झालेले आहे, परंतु केंद्र शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे साखर निर्यात न झाल्यामुळे साखरेचे दर स्थिर आहेत. परंतु प्रत्यक्ष परिस्थिती अशी आहे की, अंतरराष्ट्रीय बाजारपेठेत साखरेला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. सध्या केंद्र शासनाने २०२३ २४ हंगामासाठी एफ.आर.पी. रु.३१५०/- जाहीर केलेली असून प्रत्यक्षात साखरेचे दरामध्ये वाढ केलेली नाही. त्यामुळे साखर कारखान्यांना एफ.आर.पी. प्रमाणे शेतकन्यांना बिल देणेस अडचणी निर्माण होत. आहेत. तसेच सध्या इथेनॉल उत्पादनाची कारखान्यास गरज असून सदरचे प्रकल्प उभा करणेसाठी शासनाने मंजुरी दिलेली आहे. परंतु सदर प्रकल्प उभा करणेसाठी बँका कर्ज देणेस टाळाटाळ करीत आहेत. पुढील गाळप हंगामामध्ये आपले संचालक मंडळाने १० लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दीष्ट ठेवलेले असून रु. २५००/- च्या पुढे ऊसास पहिला हप्ता मिळू शकतो असे याप्रसंगी नमुद केले. डॉ. श्री संजीवदादा माने यांना विनंती केली की, आपण आमच्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील काही गांवे दत्तक घेऊन एकरी १०० मे. टनापेक्षा जादा उत्पादन घेणेसाठी शेतकऱ्यांना तसे मार्गदर्शन करावे. पुढील गळीत हंगामापासून एकरी १०० मे. टन ऊसाचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना श्री विठ्ठल पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे व कारखान्याचे जे चांगले काम करणारे गुणवंत कामगार असतील त्यांनाही हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार असल्याचेही सांगितले. तसेच येत्या हंगामामध्ये आपल्या कारखान्याला जास्तीत जास्त ऊस गळीतास देण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन केले.
मागील गळीत हंगाम २०२२-२३ मध्ये सर्वाधिक ऊस पुरवठा करणारे सुभाष जयराम पवार गुरसाळे ९२४.९६३ मे. टन, संतोष मुरलीधर घाडगे, देगांव ७४८.९५३ मे. टन, नारायण त्रिंबक पाटील, गुरसाळे ७४६.४९७ मे.टन या ऊस उत्पादक सभासदांचा मान्यवरांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.
सदर कार्यक्रमासाठी स्वागत व परिचय कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री डी. आर. गायकवाड यांनी केले तर प्रास्ताविक कारखान्याचे संचालक श्री तुकाराम मरके सर यांनी केले. तसेच आभार प्रदर्शन कारखान्याचे संचालक श्री सचिन शिंदे-पाटील यांनी केले व सुत्र संचालन कारखान्याचे लिगल ऑफिसर श्री ओ. जे. अवधुत व उप शेती अधिकारी श्री नितीन पवार यांनी केले. याप्रसंगी कारखान्याचे मार्गदर्शक स्वेरीचे संस्थापक सचिव श्री बी. पी. रोंगे सर, कारखान्याचे रहा.चेअरमन सौ. प्रेमलता शेंगे, राष्ट्रवादीचे मा. ता. अध्यक्ष अॅड. दिपक पवार, मनसे नेते श्री दिलीप धोत्रे, कारखान्याचे संचालक सर्वश्री संभाजी भोसले, कालिदास पाटील, दिनकर चव्हाण, सुरेश भुसे, बाळासाहेब हाके, धनंजय काळे, साहेबराव नागणे, कालिदास साळुंखे, सचिन वाघाटे, जनक भोसले, प्रविण कोळेकर, नवनाथ नाईकनवरे, सिताराम गवळी, अशोक जाधव, सिध्देश्वर बंडगर, महेश खटके, विठ्ठल रणदिवे तसेच तज्ञ संचालक सर्वश्री दशरथ जाधव, अशोक सोडले तसेच निमंत्रित संचालक सर्वश्री धनाजी खरात, तानाजी बागल, बाळु मोरे, अंगद चिखलकर, अशोक, घाडगे, गणेश ननवरे, समाधान गाजरे यांचेसह कारखान्याचे कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक, कार्यकर्ते व अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.