गणपती बाप्पा मोरया....

पीओपी गणेश मुर्त्यावर बंदी;  मुर्तीकारांना आवाहन 
सोलापूर प्रतिनिधी ---
 केंद्रीय प्रदुषण मंडळाने पीओपी मुर्तीवर बंदी घातली आहे. त्यामुळे आगामी कालावधीत येणाऱ्या गणेशोत्सवासाठी सोलापूर शहरातील मुर्ती उत्पादक, कारागीर व कामगारांनी पीओपीच्या मुर्ती तयार करु नयेत. जर कोणी केल्या तर त्यांच्यावर प्रदुषण मंडळाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार कारवाई करण्यात येईल असे सोलापूरमहापालिकेच्या वतीने देण्यात आलेल्या जाहिर प्रसिद्धीकरणात म्हंटलय.

इको फ्रेंडली गणेशोत्सव’! आता शाडूच्या गणेश मूर्तीपासून सजावट ते थेट विसर्जनापर्यंत सर्वकाही निसर्गावर कोणताही ओरखडा न येऊ देता हा उत्सव साजरा करण्याकडे लोक जागृती अभियान चालविले पाहिजे यासाठी सामाजिक संस्था, संघटना आदीनी यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे.
सोलापूर शहर व जिल्ह्यात गणेशोत्सव सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. श्री गणेशाच्या मोठमोठाल्या मुर्त्या यासाठी बनवल्या जातात. शहरात गणेश मुर्त्या तयार करणाऱ्या कारखान्यादार व कारागीराची संख्याही मोठी आहे. सोलापूरातून परराज्यातही मोठ्या प्रमाणावर गणेशमुर्त्या पाठवल्या जातात. केंद्रीय प्रदुषण मंडळाने यंदाही पीओपी मुर्त्यावर बंदी घातली असून याबाबत आदेश निर्गमीत केला आहे. तरी शहरातील मुर्ती उत्पादक व कारागीरांनी पीओपीच्या मुर्त्या तयार करु नयेत असे आवाहन महापालिकेने केल आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form