आषाढी वारी मंदिर समितीच्या उत्पन्नात ६ कोटी २७ लाखांचे दान

गतवर्षीच्या तुलनेत उत्पन्नात वाढ ५७,६३,७२५ ₹



पंढरपूर प्रतिनिधी --

  आषाढी यात्रेत श्री विठ्ठल भक्तांनी विठुरायाच्या व रुक्मिणी 
 मातेच्या चरणी लाखो रुपयांचे दान केले आहे. तसेच सोन्या -चांदीचे कोट्यवधी रुपयांचे दागिने अर्पण केले आहेत. मंदिर समितीला लाडू प्रसाद, परिवार देवता, सोने चांदी भेट, ऑनलाईन देणगी, तसेच भक्त निवास, गोशाळा आदी उत्पन्न स्तोत्रातून भरभरुन दान मिळाले आहे. 
  आषाढी यात्राकाळात  ६ कोटी २७ लाख ६० हजार २२७ रुपयांचे आर्थिक उत्पन्न मिळाले आहे. अशी माहिती व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी दिली. 

आजपासून नित्योपचार सुरू
 श्री.विठ्ठलास व श्री.रूक्मिणी मातेस पहाटे होणारी श्री ची काकडा आरती, नित्यपुजा, महानैवेद्य, पोषाख, धुपारती व शेजारती इथेपर्यंतचे सर्व राजोपचार परंपरेनुसार सुरू करण्यात येत आहेत.

   आषाढी एकादशी वारी मोठ्या उत्साहात पार पडली. या दिवशी विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक पायी प्रवास करून पंढरपूरला येतात, यालाच आषाढी वारी किंवा पंढरपूर वारी  म्हटले जाते 
    या वारकरी विठ्ठल भक्तांनी विठ्ठल रुक्मिणी  यांच्या चरणी भरभरून दान केले आहे ,यंदाच्या आषाढी एकादशीला पंढरपूरला१०ते१२लाख भाविक यात्रा काळात पंढरी नगरीत दाखल झाले होते.

#श्री विठ्ठल चरणवरील दान--४५ लाख २३ हजार २१०,
#श्री रूक्मिणी चरणावरील दान ---१२ लाख६९हजार१७३, #देणगी-२कोटी १३लाख८५हजार१३१, #सोने दागिने -१३ लाख ३२ हजार ४७५ रुपये, #हंडी पेटीतून १ कोटी ३८ लाख ८१४१,#परिवार देवता --५३लाख,४४हजार११७, #लाडू प्रसाद --७२लाख,४२हजार२८०, #विठ्ठल रुक्मिणी भक्त निवास ३९लाख हजार ७०,४७९ #ऑनलाईन स्वरूपात लाख २७ हजार ८७७ # प्रसाद विक्री ७२ लाख ४२ हजार २८० #परिवार देवता ५३ लाख ४४ हजार ११७

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form