येवल्यात आम्ही छगन भुजबळ यांचा पराभव करु
पंढरपूर (प्रतिनिधी)---
सध्याच्या राजकीय घडामोडीवर तीव्र नाराजी व्यक्त करीत घटनात्मक संस्था या मोदी, शहा यांच्या गुलाम आहेत.तर
आगामी विधानसभा निवडणुकीत येवल्यात आम्ही छगन भुजबळ यांचा पराभव करु तिथे शिवसेनेचा आमदार असेल, असे उद्गगार शिवसेना ठाकरे गटाचे खा. संजय राऊत यांनी सहकुटुंब विठ्ठल दर्शनासाठी पंढरपूर येथे आले ,असता शनिवार दि. ८ जुलै रोजी सिंहगड कॉलेज मध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले.
पुढे ते म्हणाले ,आम्ही अनेकांना वैधानिक पदे दिली राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा केले, पाच वेळा आमदारकी, विधान परिषदेत सभापती म्हणून पाठविले, हवं ते दिलं,आज तिचं माणसं पक्ष सोडून जात असतील तर लाज वाटते.शरद पवार यांच्या राजकारणामुळे आज अजित पवार दिसत आहेत. एवढी मोठी मजल मारता आली.पण कितीही संकट आली,तरी शरद पवार, उध्दव ठाकरे हे राजकीय संकटांची पर्वा करीत नाहीत. ते माघार घेणार नाहीत.
#चौकट#
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत सहकुटुंब विठ्ठल दर्शनासाठी पंढरपूर येथे आले असता ,संजय राऊत यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात जाऊन दर्शन घेतले तसेच तुकाराम भवन येथील अन्नछत्रात जाऊन त्यांनी पंगतीत प्रसाद वाढून सेवा बजावली व प्रासादिक भोजनाचा आस्वाद घेतला.
भुजबळ यांनी पुन्हा आमच्याशी गद्दारी केली आहे. पूर्वी नाशिक मध्ये आम्ही त्यांचा पराभव केला होता, आता येवल्यात पाडू. सध्याच्या राजकीय घडामोडीवर तीव्र नाराजी व्यक्त करीत घटनात्मक संस्था या मोदी, शहा यांच्या गुलाम आहेत. निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालानुसार विश्वास नाही, आता सर्वोच्च न्यायालयावर भरोसा आहे.
कोण? कशाकरीता पक्ष सोडून गेले ते सर्वांना माहीत आहे. पक्षाने यांना किती द्यायचे? अजित पवार यांच्या आमदारांना भा.ज.प. च्या तंबूत जाऊन मंत्रिपदे मिळविणे तेवढे सोपे नाही. ते म्हणतात की आम्ही संजय राऊत यांच्या मुळे गेलो, मग मी जर शिवसेना सोडली तर चाळीस आमदार परत येणार का? असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला. ते म्हणाले मी पक्षासाठी तुरुंगात गेलो. पण गद्दारी केली नाही. पण बांडगुळ गेली ते बरेच झाले,अजित पवार तिकडे गेले, यात शरद पवार यांची कोणतीही खेळी नाही, चार वेळा उपमुख्यमंत्री, सात वेळा आमदार करूनही ते गेले. याचा विषाद वाटतो, असे राऊत म्हणाले.यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे तालुका प्रमुख संभाजी शिंदे आदी मान्यवर मंडळी उपस्थित होते.


