पंढरी नगरी सजू लागली...

 संतांच्या, वारकऱ्यांच्या स्वागतासाठी नगरपालिका, महसूल प्रशासन, पोलिस प्रशासन मंदिर समिती  लगबग सुरू 



पंढरपूर प्रतिनिधी--

आषाढी एकादशीनिमित्त लाखो भावीक ,भक्त पंढरीत दाखल होतात संत ज्ञानेश्वर ,संत तुकाराम महाराज तसेच विविध संत महात्मे दिंडी पालख्या मोठ्या प्रमाणात पंढरपूर नगरीत येत असतात यासाठी पंढरपूर नगरपालिका प्रशासन पोलीस प्रशासन मंदिर समिती महसूल विभाग आधी शासन नातील विविध स्तरावरील अधिकारी मंडळी येथे दाखल झाले असून पंढरपुरात येणाऱ्या वारकऱ्यांना सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मोठ्या प्रमाणात काम सुरू असून विविध मार्गावरील रस्ते दुरुस्तीचे काम सुरू असून नदीपत्रातील स्वच्छता, लाईट , स्वच्छ पिण्याचे पाणी आधी सुविधांसाठी प्रशासनाची लगबग सुरू झाली आहे. पंढरी नगरी स्वच्छ सुंदर  ठेवण्यासाठी सर्व स्तरातून मोठ्या प्रमाणात प्रयत्न दिसून येत आहेत.

दर्शन बारीत ५ ठिकाणी थंड पिण्याचे पाण्याची सोय मंदिर समितीचे स्तुत्य उपक्रम 



  आषाढी वारी निमित्त पंढरपूर नगरीमध्ये दाखल झालेल्या विठ्ठल वारकरी भक्त भाविक यांच्या सेवा सुविधा देण्यासाठी मंदिर समितीने दर्शनबारीत असणाऱ्या वारकऱ्यांना विविध सेवा देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे चित्र दिसून येत आहे   


   गोपाळपूर येथील दर्शन बारी शेडमध्ये भरपूर गर्दी झाली असून दर्शन मोठ्या प्रमाणात विठ्ठल भक्त दर्शनासाठी रांगेत उभे राहिलेले आहेत यांना मंदिर समितीकडून थंड पिण्याचे पाणी देण्याची सोय करण्यात आली असून दर्शन बारी मध्ये पाच ठिकाणी थंड पाणी देण्याची सोय करण्यात आली आहे


Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form