सोलापूर जिल्ह्यातील पहिले गोल रिंगण

जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखीचे नेत्रदीपक रिंगण सोहळ्याने वारकरी सुखावला



नेत्रदीपक रिंगण सोहळा

 

जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखीचे सोलापूर जिल्ह्यातील पहिले गोल रिंगण अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालयाच्या प्रांगणात  झाले.  पताका, हांडे-तुळशी, विणेकरी, मृदंग व टाळकरी यांचे रिंगण झाले. तद्नंतर आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी सपत्नीक अश्व पूजन  केले. त्यानंतर अश्व रिंगणी धावले. अश्वाचे रिंगणी धावणे उपस्थित अकलूजकरांसाठी एक पर्वणीच ठरली. भक्तिमय वातावरणात पार पडलेला रिंगण सोहळा  याची देही याची डोळा अनुभवता आला. डोळ्यात साठवावा अशा नेत्रदीपक रिंगण सोहळ्याचा अभूतपूर्व  आनंद प्रत्येक भाविक वारकऱ्यांना सुखावून गेला.

 

अमेरिकन राजदूताची उपस्थिती

 

सदाशिवराव माने विद्यालयाच्या प्रांगणात झालेल्या संत तुकाराम महाराज पालखी पालखी सोहळ्याचा  सुखद अनुभव घेण्यासाठी अमेरिकेचे राजदूत माईक हेनकी हे  आवर्जून उपस्थितीत होते.

 















हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी

 

            रिंगण सोहळ्यावर हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी करण्यात आली हे या रिंगण सोहळ्याचे आणखी एक आकर्षण ठरले. रिंगण सोहळ्यासाठी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार नाना पटोले, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, आमदार राम सातपुते, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा पोलीस अधीक्षक  शिरीष सरदेशपांडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे,उपविभागीय अधिकारी नामदेव  टिळेकर यांच्यासह मान्यवर पदाधिकारी अधिकारी, वारकरी भाविक आणि अकलूज व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form