वारीच्या गर्दीवर सी.सी. टीव्हीची करडी नजर
पंढरपूर (प्रतिनिधी) --- आषाढी वारी निमित्त पंढरपूर येथे प्रमुख पालखी याच बरोबर विविध दिंड्या ,विठ्ठल भक्त मोठ्या संख्येने पंढरीत दाखल होत आहेत ,या गर्दीवर नियंत्रण रहावे व कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पंढरपूर शहर पोलिस प्रशासनाने शहरात १२० सी सी टीव्हि द्वारे संपूर्ण शहरावर करडी नजर ठेवणार आहेत अशी माहिती पंढरपूर शहर पोलिस निरीक्षक अरुण फुगे यांनी दिली.
सदर कॅमेरे छत्रपती शिवाजी महाराज चौक, पत्रा शेड,६५ एकर, मंदिर परिसर, स्टेशन रोड, प्रदक्षिणा मार्ग,वाळवंट,नदीपात्र शहरातील प्रमुख मार्ग आदी ठिकाणी बसविण्यात आले आहेत .यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात कंट्रोल रूम सज्ज केली आहे.यासाठी तिर्थक्षेत्र विकास आराखडा अंतर्गत ५कोटी रूपये खर्चून ही सी.सी.टीव्ही यंत्रणा बसविण्यात आली आहे.
त्याच प्रमाणे तीर्थक्षेत्र पोलिसिंग यंत्रणा सज्ज असून वारी कालावधीत सर्व घडामोडीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येणार आहे.
