कल्याण काळे मुळेच विठ्ठल परिवारात फूट अभिजीत पाटील ...
पंढरपूर --प्रतिनिधी
सहकार शिरोमणी श्री विठ्ठल परिवर्तन विकास आघाडी पॅनलच्या प्रचार शुभारंभ राझंणी येथिल महादेवास कौलं देऊन केला . यावेळी प्राचार्य डॉ बी पी रोंगे,ॲड दीपक पवार,अमरजित पाटील, आदी मान्यवर मंडळी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना अभिजित पाटील म्हणाले की कल्याण काळे यांनी विठ्ठल परिवार फोडला असल्याची टीका विठ्ठलचे चेअरमन अभिजित पाटील यांनी केली आहे
सहकार शिरोमणी साखर कारखाना अडचणीत आहे सभासदांची एफ आर पी थकली आहे मात्र सभेत काळे ७० टक्के सभासदांना एफ आर पी दिली आहे असे सांगत आहे मात्र प्रत्यक्षात साखर आयुक्तांच्या यादीत सहकार शिरोमणी ५० टक्के एफ आर पी दिली असल्याचे त्यांनी सांगितले काळे सभासदांची दिशाभूल करून खोटा प्रचार करत असल्याचे दिसून येत आहे या कारखाना निवडणुकीत आमचे पॅनल विजयी झाल्यास विठ्ठल प्रमाणे कारभार करण्यात येईल असे पाटील म्हणाले कैलासवासी माजी आमदार भारत भालके कारखान्याचे पहिल्यांदा चेअरमन झाल्यावर विधानसभा निवडणुकीत उभारण्याबाबत विठ्ठल परिवारातील नेत्यांची चर्चा केली होती तेव्हा कल्याण काळे यांनी भालके यांना उभारण्यास विरोध केला यानंतर राजू बाबू पाटील यांना उभे करून पाठिंबा दिला मात्र यात राजू बापू यांचा पराभव झाला यावेळी विठ्ठल परिवार फोडण्याचे काम कल्याण काळे यांनी केले असाआरोप अभिजीत पाटील यांनी यावेळी केला.

