सहकार शिरोमणी श्री विठ्ठल परिवर्तन विकास आघाडी पॅनल प्रचार शुभारंभ आज सायंकाळी ५ वाजता रांजणी येथुन होणार.
पंढरपूर --प्रतिनिधी
सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणूकीत चुरस निर्माण झालेली आहे. सत्ताधारी फायनल आणि विरोधकांमध्ये दवे प्रति दावे तसेच कारखान्याच्या सत्य परिस्थितीवर परखडभाष्य करणारे अभिजीत आबा पाटील यांनी शेतकऱ्यांना आवाहन केलेले आहे की सहकार शिरोमणी वसंतराव सहकारी साखर कारखाना गत वैभव प्राप्त करून देणार शेतकरी व कामगारांची देणे देणार सभासदांच्या मागे खंबीर उभारणार अशा अनेक अभिवचनाने त्यांनी सभासद व शेतकरी यांना आश्वासित केले आहे.
शेतकरी व सभासद, कामगार यांनी विठ्ठलचा कारभारावर विश्वास ठेवून अभिजीत आबांच्या ताब्यात दिला तसाच सहकारी शिरोमणी कारखाना सुद्धा अभिजीत आबा पाटील यांच्या पॅनलकडे द्यावा अशी शेतकऱ्यातून सभासद चर्चा सुरू आहे.

