जातीय तेढ निर्माण होईल असे वक्तव्य अथवा पोस्ट व्हायरल केल्यास कारवाई

 खबरदार! जातीय-धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या वक्तव्य अथवा पोस्ट टाकल्यास थेट ५ वर्षाचा तुरुंगवास..



सोलापूर – सोशल मीडियातून किंवा एखाद्या ठिकाणाहून धार्मिक आणि जातीय तेढ निर्माण होईल असे वक्तव्य अथवा पोस्ट व्हायरल केल्यास, संबंधितांवर भारतीय दंड विधान कलम १५३ (अ), २९५ (अ) आणि कलम ५०५ व ५०७ अंतर्गत गुन्हा दाखल होतो. त्यानुसार किमान तीन ते पाच वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो, त्यामुळे पोलिसांनी नागरिकांना विशेषतः तरुणांना अशा गोष्टींपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे.


शहानिशा न करता सोशल मीडियातून मेसेज, व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर थेट गुन्हा दाखल केला जाईल, तरूणांनी अफवा, जातीय किंवा धार्मिक तेढ निर्माण होईल अशा गोष्टी फॉरवर्ड करू नयेत, ज्यामुळे स्वत:चे आयुष्य बरबाद होईल असे आवाहन डॉ. राजेंद्र माने, पोलिस आयुक्त, सोलापूर शहर यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form