अक्कलकोट -- दि.22 नुकतेच पार पडलेल्या केंद्रीय नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेत धुळ्याच्या अनिमिष मिलिंद पंडित याने घवघवीत यश संपादन करून नवोदय विद्यालयात प्रवेश मिळविल्याने त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे .
इ.6 वी ते 12 वी पर्यंत चे पुढील शिक्षण घेण्यासाठी केंद्रीय स्तरावर प्रत्येक जिल्ह्यात 80 मुलाकरिता प्रवेश परीक्षा घेतली जाते,यामध्ये हजारो मुले परीक्षा देतात .स्पर्धा परीक्षा प्रमाणे अभ्यास करून ही परीक्षा दिली जाते .
अक्कलकोट चे सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार चंद्रकांत वेदपाठक यांचा हा नातू आहे .वेदपाठक यांची थोरली कन्या सौ.राजश्री व धुळ्याचे शिक्षणाधिकारी व वेदपाठक यांचे जावई मिलिंद पंडित यांचा अनिमिष हा मुलगा आहे .
पहिल्याच प्रयत्नात यश लाभल्याने अनिमिष याचा सर्वत्र अभिनंदन होत असून पुढील शिक्षणासाठी त्याला मोठ्या प्रमाणात शुभेच्छा देण्यात येत आहे.
