गट सचिव हा आमच्या परिवाराचा घटक :परिचारक

 मालकांच्या राजकारणामध्ये गट सचिवांचे योगदान फार मोठे आहे. जे नाते सचिवांचे आणि मोठ्या मालकांचे होते ते इथून पुढे आपणही जोपासू --मा.आमदार प्रशांत परिचारक



पंढरपूर प्रतिनिधी :
 गट सचिव हा परिचारक परिवाराचा महत्त्वाचा घटक असल्याचे प्रतिपादन मा.आमदार प्रशांत रावजी परिचारक साहेब यांनी केले. ते पंढरपूर तालुक्यातील सेवानिवृत्त गट सचिवांच्या सेवानिवृत्ती निमित्त बोलत होते. पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहामध्ये आयोजित केलेल्या या कार्यक्रमांमध्ये बोलताना ते म्हणाले की, गटसचिव व स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक यांचे एक अतूट जिव्हाळ्याचे नाते होते मोठ्या मालकांच्या राजकारणामध्ये गट सचिवांचे योगदान फार मोठे आहे. जे नाते सचिवांचे आणि मोठ्या मालकांचे होते ते इथून पुढे आपणही जोपासू. तसेच इथून पुढे नवीन गटसचिवांनी संस्था या नावाप्रमाणे विविध कार्य करून सोसायटीच्या नावलौकिक वाढवावा असे म्हणाले.
    यादरम्यान कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखाना लि.,श्रीपुर या कारखान्याच्या नूतन तज्ञसांचालकांचाही निवडीबद्दल सत्कार करण्यात आला.
यावेळी मा. श्री. तानाजीराव वाघमोडे देशमुख, मा.श्री. हरीशदादा गायकवाड, मा.श्री.दिलीपराव चव्हाण, मा.श्री.दाजी भुसनर, मा.श्री.दिनकर भाऊ मोरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी मा.श्री.तानाजीराव वाघमोडे -देशमुख, श्री.विजय माळी, श्री.बाळासो बुधनेर श्री.ज्ञानदेव मदने,श्री.मच्छिंद्र पाटील,श्री.बाळासाहेब सावंत, श्री.नानासो सरवळे,श्री.विष्णुपंत लिंगे , श्री.अनिल भाकरे, श्री.विष्णू पिसे, श्री.विजय कुलकर्णी, श्री.विजय फाटे यांच्या सेवानिवृत्ती निमित्त सत्कार करण्यात आला.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक सोलापूर गट सचिव संघटनेचे अध्यक्ष मा.श्री.पांडुरंग व्यवहारे साहेब यांनी केले व सूत्रसंचालन श्री.विजयकुमार मोकळे यांनी केले यावेळी श्री.पांडुरंग व्यवहारे यांनी सचिवांचे पगार वेळेत व्हावेत, याबाबत योग्य ते आदेश संबंधितांना व्हावे अशी विनंती केली व आभार श्री.मधुकर कदम यांनी मानले.सदर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी पंढरपूर गट सचिव संघटनेने परिश्रम घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form