खासगी दुध संघांकडून करण्यात आलेल्या दुध दर कपातीच्या विरोधातआंदोलन

 पांढर्‍या दुधावरच्या काळ्या बोक्यांमुळे दुध उत्पादक शेतकरी अडचणीत......रणजित बागल 





पंढरपूर- 
पुणे पालखी महामार्गावर भंडिशेगाव येथे आज दुध उत्पादक शेतकरी व सर्व पक्षीयांच्या वतिने रास्तारोकोचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी बोलताना, शिवसेना युवासेनेचे युवा नेते रणजित बागल म्हणाले की, 'राज्यात शेतकरी अडचणीत आहे, बाहेरच्या राज्यातून शेतकर्‍यांनी मोठ्या किमती देवुन गाई खरेदी करून आणल्या आहेत, तसेच या गाईंना मुबलक चारा व पशुखाद्य देखील देण्यास मोठा खर्च होतो,तो खर्च देखील सहन करत दुध उत्पादक शेतकरी पशुधन संभाळतो,मात्र आज दुध दर कपातीमुळे शेतकरी हैराण झाला आहे, एकतर आधीच लंपी रोग व आता दर कपात यामुळेच शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले  आहे. अशामध्ये जर हे मुजोर दुध संघ चालक दुधदर कपात करत असतिल तर हा अन्याय आहे, आणि याबाबत हे शिंदे फडणवीस सरकार देखील कोणतेही ठोस पावले उचलुन शेतकऱ्यांना दिलासा देवु इच्छीत नाही, दुध संघ मालकांची मुजोरी व शासनाची उदासीनता याकडे लक्ष वेधण्यासाठी आजचे रास्तारोको आंदोलन आयोजित करण्यात आलेले आहे.

    पुढे बोलताना बागल यांनी,"सरकारने या दर कपातीच्या निर्णयात तात्काळ हस्तक्षेप करून दुध संघाना वठणीवर आणावे, दुध उत्पादक शेतकर्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी सरकारने वरिष्ठ पातळीवर एक कमेटी नेमावी व त्याद्वारे शेतकऱ्यांना न्याय द्यावा,मुजोर दुध संघ मालक अशा पांढर्‍या दुधावरील बोक्यांना सरकारने कारवाईचा बडगा उगारूप दुधदर कपातीस चाप बसवावा" आदि मागण्या यावेळी बोलताना केल्या, आगामी काळात दुधदर कपातीचा निर्णय मागे घेवुन शेतकऱ्यांना दिलासा न दिला गेल्यास राज्यभरातील दुध उत्पादक शेतकरी रस्त्यावर नक्कीच उतरेल,येत्या काळात शासनाचे कुठलेही मंत्री पंढरपूरात आल्यावर त्या मंत्र्यांना देखील हे शेतकरी दुधाने अंघोळ घालतील, व त्याप्रसंगी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष भक्कमपणे त्या शेतकऱ्यांच्या सोबत असेल असे ही बागल म्हणाले.
यावेळी शशिकांत नागटिळक,समाधान तुकाराम गाजरे,समाधान भैय्या गाजरे,इकबाल शेख,दिपक गाजरे,निवास नागणे,दिपक सुरवसे ,विक्रांत जगदाळे यांसह दुध उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येत उपस्थित होते..

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form