पंढरपूर /प्रतिनिधी
पंढरपूर येथे श्री संत चोखामेळा महाराज पुण्यतिथी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.तीर्थक्षेत्र पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरासमोर नामदेव पायरी जवळ असलेल्या श्री संत चोखामेळा यांच्या मंदिरात श्री चोखामेळा महाराज ट्रस्टच्या वतीने दशमी ते त्रैयोदशी या कालावधी मध्ये श्री संत नामदेव महाराज यांचे वंशज यांच्या सहकार्याने व संत चोखामेळा महाराज ट्रस्टच्या वतीने सालाबाद प्रमाणे याही वर्षी पुण्यतिथी सोहळा पार पडला.
यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष रामदास सर्वगोड यांच्या हस्ते महाराज मंडळींचा सत्कार करण्यात आला.उत्सवा दरम्यान दशमी दिवशी शेंडगे महाराज यांचे कीर्तन तर एकादशी दिवशी कबीर महाराज फड गुरुजी बापू राशिनकर यांचे कीर्तन झाले तर पुण्यतिथी दिवशी श्री संत नामदेव महाराज यांचे वंशज यांनी वंश परंपरेने श्री गुरु केशव महाराज नामदास यांचे कीर्तन झाले.अखंड हरीपाठाची सेवा ज्ञानेश्वर महाराज रोकडे महाराज, अनिल खंदारे, सेवाधारी पुजारी अभिमन्यू हरी सर्वगोड यांनी पार पाडली.
