पंढरपूर
पंढरपूर तालुक्यातील रोपळे येथील सुपूत्र व एबीपी शिक्षण समुहाचा विद्यार्थी शिवराज उमेश कदम यांने एनएमएमएस परीक्षेमध्ये यश संपादीत करून तो या परीक्षेतील शिष्यवृती धारक झाला आहे.
एनएमएमएस या परीक्षेमध्ये एबीपी शिक्षण समुहातील ४३ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये ४० विद्यार्थी शिष्यवृती धारक पात्र झाले असून यामध्ये शिवराज उमेश कदम यांने इयत्ता आठवीसाठीच्या या परीक्षेमध्ये सर्वोत्तम घवघवीत यश संपादन केले आहे. या यशामुळे त्यास सलग चार वर्षे प्रतिवर्षी १५ हजार रूपये प्रमाणे शिष्यवृत्ती मिळणार आहे.
या यशासाठी शिवराज कदम व गुणवंत विद्यार्थ्यांना एबीपी शिक्षण समुहातील प्रचार्य एस.आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. तर या यशाबद्दल विद्यार्थी व शिक्षकांचे संस्थापक अध्यक्ष ए.बी. पाटील, सचिव अमोलकुमार पाटील, शिक्षक, कर्मचारी व पालक तसेच रोपळे परीसरातील नागरिकांनी अभिनंदन केले आहे.
