बाल मित्रांचा भरला स्नेह मेळावा.*
![]() |
*रामभाऊ जोशी हायस्कूलच्या प्रगती व यशाबद्दल कौतुकाचा वर्षाव.*
करकंब प्रतिनिधी :-
रामभाऊ जोशी हायस्कूल करकंब येथे मार्च -1972 -73 जुनी अकरावी या विद्यार्थ्यांनी 50 वर्षानंतर परत एकदा या शाळेत भेट दिली. रामभाऊ जोशी हायस्कूल करकंब अकरावी बॅच सन- 1972 -73 करकंब स्नेह मेळावा हा बालमित्र परिवार या नावाने शाळेत आयोजित करण्यात आला.
मेळाव्याची सुरुवात सर्व माजी विद्यार्थ्यांचे औक्षण करून व गुलाब पुष्प प्रशालेतर्फे देऊन सौ. मनीषा ढोबळे मॅडम व कुमारी - अश्विनी शिंगटे मॅडम यांनी स्वागत केले, इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी माजी विद्यार्थ्यांवर स्वागतपर पुष्पवृष्टी केली.
सदर बालमित्र मेळावा चे अध्यक्ष माजी मुख्याध्यापक -एम. आर. सहस्त्रबुद्धे होते.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सदर विद्यार्थ्यांना शिकवणारे सौ. आरगडे मॅडम, बुगड गुरुजी, वेळापूरकर गुरुजी, केरबा भाजीभाकरे (काका), मुख्याध्यापक -हेमंत कदम हे उपस्थितीत होते.
जुनी अकरावी सन 1972- 73 बॅचच्या आठ विद्यार्थिनी हजर होत्या. त्यांच्या हस्ते सरस्वती च्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.त्यानंतर अध्यक्ष व सर्व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. सदर कार्यक्रमासाठी जवळपास 60 माजी विद्यार्थी हजर होते.प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व आपला परिचय करून दिला. या मनोगतामध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांची व त्या काळातील शाळेबद्दल च्या अजरामर आठवणी काढल्या. आपण शाळेत कसे वाढलो, कसे मोठे झालो.. आणि शाळेतील "संस्कार" ...हे शेवटपर्यंत कसे उपयोगी आले हे सांगितले. तसेच आजची या शाळेची प्रगती पाहून त्यांनी खूप- खूप आनंद व समाधान व्यक्त केले.
अध्यक्ष भाषणामध्ये एम आर सहस्त्रबुद्धे सर यांनी माजी विद्यार्थ्यांना बहुमोल असे मार्गदर्शन केले.
या सर्व माजी विद्यार्थ्यांनी आपली आठवण म्हणून रामभाऊ जोशी हायस्कूल अतिशय चांगल्या दर्जाचे(साधारण 75 हजार रुपयाची) डबल डोअर ची पाच लोखंडी कपाटे त्यांच्याकडून देण्यात आली.सदर माजी विद्यार्थी मेळाव्यात राहुल शीलवंत यांनी नेत्र दीपक अशी रांगोळी काढली. यावेळी माजी विद्यार्थ्यांकडून परदेशी केटरर्स मार्फत सकाळी नाष्टा व दुपारी अतिशय उच्च दर्जाचे जेवण सर्व विद्यार्थ्यांनी मिळून केले.जाता -जाता आपली आठवण राहावी म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याला "बालमित्र मेळावा परिवार "कडून एक टेबल कप, टर्किस्ट टावेल, कॅप इत्यादी वस्तू भेट स्वरूपात दिल्या.
दुपारी जेवण झाल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी आपला *आतापर्यंतचा जीवन प्रवास* या शीर्षकाखाली सर्वांनी सगळ्यांच्या सुखदुःखाची जाणीव करून घेतली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी
जुनी अकरावी सन 1972 -73 बॅचचे विद्यार्थी - राजेश (भाई) शहा, बाहुबली शहा, डॉ. श्रीकांत देवकते , शिवाजी व्यवहारे सर अमृतलाल (काका) पुरवत, जवाहरलाल मोहिते( काका), एडवोकेट- एन डी माळी , तुळशी गावचे - भीमराव आवटे, एन के मोरे, सौ. शामल देशपांडे, या सर्वांच्या नियोजनाने व जुनी अकरावी 1972 -73 च्या सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी मिळून हा मेळावा अतिशय चांगल्या रीतीने यशस्वीपणे पार पाडला.

