पंढरपूर/प्रतिनिधि
आपटे उपलप प्रशाला पंढरपूर येथील विद्यार्थिनी कु. जान्हवी विजयकुमार कोळी हीने राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत सोलापूर जिल्ह्यात अनुसूचित जामाती संवर्गात चौथ्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे .
परीक्षेत यश संपादन केल्यामुळे कु.जान्हवी कोळी ह्या विध्यार्थीनीला पुढील सलग पाच वर्षे शिष्यवृत्ती मिळणार आहे. तिचे अभिनंदन प्रशालेचे मुख्याध्यापक़ जयंत हरिदास, पर्यवेक्षक दत्तात्रय धारूरकर ,विद्या विकास मंडळाचे सचिव बा. ज. डांगे उपसचिव वि.वि.भातलवंडे तसेच ज्येष्ठ शिक्षक अनिल अभंगराव, बंडू गुलाखे यांनी केले.
तिला या परीक्षेसाठी विशेष मार्गदर्शन नरेंद्र डांगे, राहुल भातलवंडे, गणेश गंगेकर, अजित कुरे, रुपाली कुलकर्णी, गीतांजली हरिदास मॅडम या शिक्षकांनी केले.
तिच्या यशामुळे कोळी समाजामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून तिचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
