मन की बात आयोजित कार्यक्रमात रोहिणी कस्तुरे यांचा सत्कार

 












पंढरपूर प्रतिनिधी--

येथे मन की बात शंभरावा  आयोजित कार्यक्रमात कर्तृत्ववान महिला रोहिणी कस्तुरे यांचा सपत्नीक सत्कार जिल्ह्याचे आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते करण्यात आला.

     


      यावेळी बोलताना ते म्हणाले की पंतप्रधान मोदी यांनी मन की बात कार्यक्रम हा समाजातील कर्तृत्ववान लोकांचे कार्य जनते पर्यंत पोहचवणे हाच उद्देश आहे, त्यानिमित्ताने पंढरपूर येथील सर्व सामान्य परिवारातील  एक महिला बचतगट, आरोग्य, लघुउद्योग, कौटुंबिक समस्या सोडविण्यासाठी स्री पुरुष समोपदेशन, शैक्षणिक, आर्थिक सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे , यांच्या कार्याची दखल घेत महाराष्ट्र राज्य पांचाळ सोनार समाज महामंडळाच्या महिला अध्यक्षा म्हणून निवड झाली आहे याबाबत त्यांनी कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या .
याप्रसंगी कार्यक्रमाचे आयोजक संजय निंबाळकर,आण्णा धोतरे,राजु भाऊ पवार,अमोल डोके,दीपक पंडित,उमेश पंडित सर,
 गजानन पंडित,शशिकांत पोतदार सर आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form