जिल्हा काँग्रेस ओबीसींची मागणी

 पंढरपूर नगरपालिकेतील  भ्रष्टाचाराबाबत मुख्याधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा अन्यथा नगरपरिषदेच्या समोर तिर्डी आंदोलन करण्यात येईल 



 पंढरपूर : प्रतिनिधी 
पंढरपूरनगरपालिकेतील भ्रष्टाचाराबाबत मुख्याधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावी अशी मागणी जिल्हा काँग्रेस ओबीसींच्या वतीने करण्यात आला आहे.पंढरपूर नगरपरिषद येथे लोक प्रतिनिधींचा कार्यकाळ संपलेला असून गेल्या अनेक महिन्यापासून प्रशासकीय राजवट सुरू आहे तर पंढरपूर नगर परिषदेचे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी यांचे दालन बहुतांश वेळात बंदच असते आणि दुसरीकडे लोकप्रतिनिधी नसल्याकारणाने नगरपालिकेमध्ये भ्रष्टाचार बोकाळलेला आहे. 
  नुकताच झालेला तथाकथित झोपडपट्टी कर वसुली घोटाळा व डीसीसी बँके मागील भूखंड घोटाळा या प्रकरणांमध्ये केवळ सर्वसामान्य कर्मचाऱ्यांना बळी देऊन मुख्याधिकारी साहेब नामा निराळे कसे राहतात नगरपालिकेच्या कारभाराची यश व अपयशाची जबाबदारी ओघानेच मुख्याधिकारी साहेबांच्या कडे जात असते सर्व सह्या व जबाबदारी ही मुख्याधिकाऱ्यांची असते तेव्हा संबंधित प्रकार ने हाताळताना मुख्याधिकारी साहेबांनी योग्य ती पडताळणी केली नाही का ?केली असेल तर ते जबाबदार नाहीत का ? आणि जर योग्य ती पडताळणी न करता आंधळेपणाने सह्या केल्या असतील तर तोही गुन्हा नाही का? तरी आशा गुन्ह्या खाली कर्तव्य दक्ष मुख्याधिकारी यांना जबाबदार धरून असा गंभीर गुन्ह्यात गुन्हा दाखल करून ताबडतोब अटक करण्यात यावी 

अन्यथा दिनांक ४ मे २०२३ रोजी मुख्याधिकारी यांची प्रतिमिकात्मक तिरडी बांधून नगर परिषदेच्या समोर तिर्डी आंदोलन करण्यात येईल याची सर्व जबाबदारी प्रशासनावरती राहील अशा आशयाचे निवेदन उपजिल्हाधिकारी तथा प्रांताधिकारी साहेब यांना सोलापूर जिल्हा काँग्रेस ओबीसी विभागाच्या वतीने देण्यात आले .
यावेळी सोलापूर जिल्हा काँग्रेस ओबीसी विभागाचे  जिल्हाध्यक्ष समीर कोळी सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष नागेश गंगेकर सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष राजकुमार पवार सोलापूर जिल्हा काँग्रेस ग्राहक सेल जिल्हाध्यक्ष संग्राम जाधव माढा तालुका अध्यक्ष सौदागर जाधव सोशल मीडिया पंढरपूर माढा विधानसभा अध्यक्ष सागर कदम पंढरपूर मंगळवेढा विधानसभा अध्यक्ष बाळासाहेब आसबे देवानंद इरकल, शिवकुमार भावलेकर, दादा वाघमारे आदी कार्यकर्ते उपस्थित होते

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form