डॉ.रांजेद्र शहा म्हणजे बहुआयामी व्यक्तिमत्त्व

 


*डॉ. राजेंद्र शहा सर

विवेकशील विचारांचा हसतमुख व प्रसन्न व्यक्तिमत्त्व डॉ राजेंद्र शहा यांचे  दुःखद निधन झाल्याची बातमी कळली आणि सरां सोबत काम करत असताना मी पाहिलेले सर त्यांच्या सोबत काम करत असताना आलेला अनुभव डॉ . राजेंद्र शहा म्हणजे माणसांना जोडण्याचे एक अजब रसायन त्यांच्या जवळ होत . प्रत्येक समस्येशी सामना करण्याचं त्यांच्यात सामर्थ्य होत . समस्या याआपल्यातील सामर्थ्य सिध्द करण्यासाठीच येतात आणि ती योग्यता आपल्यात आहे अशी त्यांची धारणा होती असे सकारात्मक विचारांचा  दृष्टिकोनाचा विवेकशील स्वामीभक्त सर म्हणजे राजू सर. 21 वर्षे सिव्हील हॉस्पिटलमध्ये दंत रुग्णांची सेवा करून सोलापुरात दंत महाविद्यालय व रुग्णालय निर्मिती करण्याचा मानस l ध्यास l स्वप्न l संकल्प घेऊन सरकारी नोकरीला रामराम ठोकनारा व त्या स्वप्नाची सत्यात निर्मिती करण्यासाठी सोलापूरचे माजी खासदार श्री लिंगराजजी वल्याल, वैद्यकिय शिक्षण व संशोधन, मुंबई व माजी अधिष्ठाता वैशंपायन मेडिकल कॉलेज चे डॉ R.O. शर्मा सर तसेच डॉ सुनील वायचळ यांची मोट बांधणारा अवलिया म्हणजे राजू मोहनलाल शाह अर्थात राजू सर ..  श्रीमती मल्लवाबाई वल्याल मेमोरियल चॅरिटेबल डेंटल हॉस्पीटल अँड रिसर्च सेंटर , सोलापूर या संस्थेची स्थापना जुलै 1996 मध्ये तत्कालीन आरोग्यमंत्री मा. पुष्पाताई हिरे यांच्या अमृतहस्ते शुभारंभ करण्यात आला आणि पुढे वाटचाल सुरू झाली ती दंत महाविद्यालयाच्या उभारणीची. पंडित दीनदयाळ उपाध्याय दंत महाविद्यालयाच्या माध्यमातून  सरांशी भेट झाली व त्यातून एक अतूट नातं निर्माण झालं होतं. 

जिद्द, चिकाटी, स्वयं शिस्त, कार्य पुर्णत्वास I सिद्धीस नेण्याची हातोटी  असणारा, सदा हसतमुख व प्रसन्न व्यक्तिमत्वचा धनी असलेले असे अनेकाविध सकारात्मक विचारांची अंतर्मनातून बांधणी असणारा ऊर्जावान व्यक्तिमत्व अनुभवास आला. दंत वैद्यकिय पदवी अभ्यासक्रमास 40 प्रवेश क्षमता असलेले मान्यता प्रमाणपत्र भारतीय दंत परिषद, नवी दिल्ली l वैद्यकिय संशोधन व औषधी द्रव्ये विभाग, मंत्रालय, मुंबई तसेच महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांच्या कडून मिळवले. दंत वैद्यकिय अभ्यासक्रम सुरू झाल्याने सोलापूरच्या इतिहासात एका सुवर्णयुगाचा पाया रोवण्यात आल्याची भावना सामान्य नागरिक व बुद्धिजीवी घटकांकडून व्यक्त झाल्या. तद्नंतर 100 प्रवेश क्षमता असलेले महाविद्यालय म्हणून मान्यता मिळाली. आज या महाविद्यालयाचे वटवृक्षात रूपांतर झाले असून 6 विषयात पदव्युत्तर अभ्यासक्रम ही सुरु असून शेकडो विद्यार्थी विद्यार्जन करीत आहेत. मा प्रितम ताई मुंडे व मा पंकजाताई मुंडे यांच्या नेतत्वाखाली संस्थेची वाटचाल सुरू आहे. 


जिद्द, चिकाटी, स्वयं शिस्त, कार्य पुर्णत्वास I सिद्धीस नेण्याची हातोटी  असणारा, सदा हसतमुख व प्रसन्न व्यक्तिमत्वचा धनी असलेले ऊर्जावान वाटसरू आज येथे विसावला. असे व्यक्तिमत्त्व आज आपल्यातून निघून गेले असले तरी ते त्यांच्या विचारातून l त्यांनी केलेल्या सेवेतून l कार्यातून त्याचे सुगंध सर्वदूर पसरत राहील.

डॉ. राजेंद्र शहा सर कार्य 

- संस्थापक सचिव - श्रीमती मल्लवाबाई वल्याल मेमोरियल चॅरिटेबल डेंटल हॉस्पीटल अँड रिसर्च सेंटर , सोलापूर संचलित

*पंडित दीनदयाळ उपाध्याय दंत महाविद्यालय*

- संस्थापक व अध्यक्ष- साई डेंटल हॉस्पीटल अँड रिसर्च सेंटर.

- संस्थापक व अध्यक्ष- डेंटल सोसायटी फॉर इंडिया

_ संपादक - साहेबांचा साहेब वृत्तपत्र

- संपादक - जय जप तप अध्यात्मिक मासिक

 *कौटुंबिक माहिती*

    त्याच्या पाशात पत्नी,मुलगा व दोन मुली,नातवंडे असा परिवार आहे .

*सदैव आपल्या ऋणानुबंधनात*

श्रीनिवास पोटाबत्ती

माजी फायनान्स ऑफिसर,

पंडीत दीनदयाळ उपाध्याय दंत महाविद्यालय

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form