रहमत , बरकत ,इबादत का पाक महिना
पंढरपूर -प्रतिनिधी
पंढरपूर येथील अकबर अल्ली नगरामध्ये राहणारे मोहिन तांबोळी यांचे सात वर्षाचा मुलगा जियान तांबोळी याने पहीला रोजा रविवारी पुर्ण केला.
सध्या रमजानचा पवित्र महिना सुरू असून या महिन्यामध्ये मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात रोजा करतात. या पवित्र महीन्यामध्ये रोजा केल्याने बरकत येते. तर कुटूंबाच्या व समाजाच्या स्वस्थ्यासाठी प्रार्थना केली जाते. या महीन्यामध्ये एक पुण्याचे काम केल्यास ७० पुण्याची कामे कल्याचे फळमिळते अशी धारणा आहे. त्यामुळे या महीन्यात प्रार्थना, दान, कुराण पठण, अन्नदान आदी पुण्यकर्मे केली जातात.
याच दृष्टीकोनातून पंढरपूर येथील जियान मोहीन तांबोळी याने अवघ्या सातव्या वर्षी चौदा तासापेक्षा जास्त कालावधीचा उपवास करून आपला पहीला रोजा पुर्ण केला. हा रोजा पुर्ण केल्याबद्दल वडील मोहीन तांबोळी व समाज बांधव यांनी जियानचे अभिनंदन केले आहे.

