पंढरपूर --प्रतिनिधी भाजपा युवा मोर्चा व सन्मित्र ग्रुप च्या वतीने क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले जयंती निमित्त अॅड प्रशांत उंडाळे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण केले, तसेच ज्यांनी स्री शिक्षणाचे महत्वाचे कार्य केले , अस्पृश्यता निवारणासाठी मोलाचे कार्य केले अशा क्रांतीकारक, थोर विचारवंत, समाजसेवक महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन करण्यात आले.
यावेळी प्रमुख उपस्थितीत भाजप युवा मोर्चा अध्यक्ष विदुल अधटराव , निलेश (गोलू) लकेरी ,प्रशांत (बाबा) धुमाळ, विजय (भैय्या) दहिवडे, तुकाराम चव्हाण, सतीश सासवडकर,
अजय दहीवडे, सचिन जोशी,अविनाश जक्कल,अक्षय सासवडकर, बाबू पवार, ऋतुराज रोपाळकर, आकाश पोळ,आदित्य भोसले आदी मान्यवर मंडळी उपस्थित होते.
