वेणुनगर, दि. २१ कारखाना कार्यस्थळावरील श्री विठ्ठल रुक्मिणी श्रीराम-लक्ष्मण सीता माहती या देवतांची प्राणप्रतिष्ठा अक्षयतृतिया या दिवशी झाल्याचे औचित्य साधून दिनांक २१.०४.२०२३ ते २८.०४.२०२३ या कालावधीमध्येअखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन केले होते. या कालावधीमध्ये दररोज काकडा, ज्ञानेश्वरी पारायण, संत तुकाराम महाराज गाथा भजन, हरिपाठ, किर्तन व हरिजागर हे नित्य नियमाचे दैनंदिन कार्यक्रम आयोजित केलेले होते.
मागील २ वर्षापासून कारखाना बंद असल्यामुळे व कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे सदर सप्ताहाचे आयोजन केलेले.
नव्हते. परंतु पावर्षी कारखान्याचे चेअरमन मा. श्री अभिजीत धनंजय पाटील यांचे प्रेरणेने तसेच संचालक मंडळाच्या ब
ह.भ.प.प्रा.श्री तुकाराम महाराज मस्के, ह.भ.प. श्री आण्णा महाराज मुसनर यांचे मार्गदर्शनाखाली पुनः श्व अखंड हरिनाम
सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा चालु केला असल्यामुळे परिसरातील भाविक भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण
होवुन या सप्ताह कालावधीमध्ये कारखाना परिसर भक्तीमय झाला असल्याचे दिसुन आले. तसेच ज्ञानेश्वरी पारायणासाठी
कारखाना कॉलनी व परिसरातील महिलांचा चांगला प्रतिसाद मिळलेला आहे. कारखाना परिसरातील भावीक भक्त मोठया
संख्येने सहभागी झालेले होते. सदर सप्ताहामध्ये कारखान्याचे संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारी व परिसरातील नागरिकांनी
अन्नदान करणेसाठी मोठा सहभाग नोंदविलेला होता.
या सप्ताहाची सांगता भव्यदिव्य दिंडी नगर प्रदिक्षणा व ह. भ. प. श्री बापुसाहेब महाराज देहुकर, विदयमान वंशज
श्री संत तुकाराम महाराज व माजी अध्यक्ष देहु संस्थान, देहु यांचे काल्याचे किर्तनाने झाली. ह.भ.प. श्री बापुसाहेब महाराज
यांनी अनेक अध्यात्मिक उदाहरणे देवुन काल्याचे किर्तनाचे महत्व सांगितले. आपल्या अध्यात्मिक शैलीमध्ये बोलताना ते
म्हणाले की, श्री विठ्ठल कारखान्याची धुरा हुशार व्यक्तीमत्व असणाऱ्या अभिजीत पाटील यांच्या सारख्या युवा नेतृत्वाकडे
सोपविल्याने सर्व सभासदाचा व परिसराचा सर्वांगीण विकास करणेसाठी आशिर्वाद दिले. तत्पूर्वी दिडी नगरप्रदिक्षणामध्ये
प्रशालेच्या विदयार्थी व विदयार्थीनी वेगवेगळ्या आकर्षक वेशभुषेत मोठया प्रमाणात सहभाग घेवुन पंचक्रोशीतील लोकांची
मने आकर्षित केली. काल्याच्या नंतर महाप्रसादाचा सर्वांनी आस्वाद घेतला.
सदर कार्यक्रम प्रसंगी कारखान्याचे चेअरमन अभिजीत (आबा) पाटील म्हणाले की, कारखान्याच्या ज्या परंपरा बंद
पडलेल्या आहेत त्यापैकी ही एक बंद पडलेली अखंड हरीनाम सप्ताहाची परंपरा चालू केलेली आहे ही परंपरा पुढे चालु
ठेवणेसाठी परिसरातील सर्वांनी सहभागी होवुन हा सप्ताह पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले त्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार
मानले. पुढील काळामध्ये यापेक्षाही मोठ्या प्रमाणामध्ये सोहळा पार पाडण्यासाठी आपले असेच सहकार्य लाभावे, अशी
आशा व्यक्त केली. अखंड हरिनाम सप्ताहामध्ये अन्नदान केलेल्या अन्नदात्यांचा सत्कार कारखान्याचे चेअरमन मा. श्री
अभिजीत पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
सदर कार्यक्रमासाठी सर्व संचालक मंडळ, प्र. कार्यकारी संचालक श्री डी. आर. गायकवाड, सभासद, अधिकारी,
कर्मचारी व कामगार तसेच परिसरातील असंख्य भाविक भक्तांच्या उपस्थितीत हरीनाम सप्ताहाचा सांगता समारंभ संपन्न
झाला.कार्यक्रम यशस्वी पार पाडलेबद्दल कारखान्याचे संचालक तुकाराम मस्के सर यांनी सर्वांचे आभार मानले.

