डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी शिवतीर्थावर होणार पुरस्काराचे वितरण.
पंढरपूर /प्रतिनिधी
महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान संचलित जयंती उत्सव समितीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमत कृषी क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल इसबावी येथील दिपक बळीराम बनसोडे यांना राज्यस्तरीय डॉ.पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे.
सदर पुरस्काराचे वितरण शुक्रवार दिनांक १४ एप्रिल २०२३ या जयंतीदिनी पंढरपूर येथील शिवतीर्थावर मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.
बीएससी ॲग्रीचे शिक्षण रत्नाई कृषी महाविद्यालय अकलूज येथे पूर्ण करून दिपक बनसोडे यांनी कृषी क्षेत्रात पाऊल टाकले पुढे राष्ट्रीय कृषी योजनेअंतर्गत डाळिंब पिकावरील किड व रोग सर्वेक्षण सल्ला व व्यवस्थापन प्रकल्प या योजनेअंतर्गत राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र व महात्मा फुले विद्यापीठ राहुरी यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र शासन कृषी विभाग येथे कीड सर्वेक्षक म्हणून उल्लेखनीय काम केले आहे. तसेच प्लास्टिक कल्चर टेक्निकल ट्रेनिंग नवी दिल्ली व ॲग्री क्लिनिक अँड ऍग्री बिझनेस मॅनेजमेंट हैदराबाद येथे त्यांचे ट्रेनिंग पूर्ण केले आहे.
शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या पिकाविषयी असणाऱ्या कीड व रोगांविषयी अडचणी सोडवण्याचे काम केले आहे. पुढे त्यांची सन २०१७ मध्ये जर्मन येथील एग्रीकल्चर कंपनीत टेरिटरी मॅनेजर म्हणून निवड झाली. त्यांच्या अकरा वर्षाच्या प्रात्यक्षिक ज्ञानाचा तसेच कृषी शिक्षणाच्या आधारे २०२१ मध्ये त्यांनी स्वतःचे कृषी सेवा केंद्र सुरू करून स्वतःचा ॲग्री कन्सल्टंट हा व्यवसाय सुरू केला.
यातून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना मोफत सल्ला देण्याचे काम त्यांचे अविरत सुरू आहे.
त्यांनी शेतकऱ्यांना योग्य माहिती व टेक्निकली नॉलेज दिल्याने शेतकऱ्यांचे नुकसान कमी होऊन पिकांचे उत्पन्न वाढल्याने त्यांच्याविषयी शेतकऱ्यांमध्ये आदराचे स्थान निर्माण झाले आहे.
त्यांच्या या कामाची दखल घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान यांच्यावतीने दिला जाणारा डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्काराने दिपक बळीराम बनसोडे यांचा शुक्रवारी जयंतीदिनी सन्मान होणार आहे.
