श्री विठ्ठल कारखान्याचे गळीत हंगाम २०२३-२४ साठी ऊस तोडणी वाहतूक कराराचा शुभारंभ व श्रीराम नवमीचा उत्सव साजरा
वेणुनगर, पंढरपूर ---
दि.३० गुरुवार दि.३०.०३.२०२३ रोजी श्रीराम नवमीच्या शुभ मुहूर्तावर कारखाना कार्यस्थळावर कारखान्याचे चेअरमन श्री अभिजीत पाटील यांचे मार्गदर्शनाखाली व्हा. चेअरमन सौ. प्रेमलता रोंगे मॅडम यांचे प्रमुख उपस्थितीमध्ये व संचालक श्री सुरेश भुसे, श्री कालिदास साळुंखे यांचे शुभहस्ते गळीत हंगाम २०२३ २४ साठी ऊस तोडणी वाहतूक कराराच्या अजांचे विधीवत पुजन करून ऊस तोडणी व वाहतूक कराराचा आजपासून शुभारंभ करणेत आला.
गळीत हंगाम २०२३ २४ साठी ज्या तोडणी वाहतुक ठेकेदारांना श्री विठ्ठल कारखान्याकडे करार करावयाचा आहे, अशा सर्व ठेकेदारांनी आपले अर्ज दि.१५.०४.२०२३ पर्यंत कारखान्याच्या शेती विभागाकडे वेळेत सादर करावेत. २०२३ २४ हंगामा करीता कारखान्याचे गाळप क्षमतेप्रमाणे गाळप करणे करीता ट्रक- ट्रैक्टर ५००, डंपींग ट्रैक्टर ४०० व बैलगाड़ी ४५० याप्रमाणे यंत्रणेचे करार करावे लागणार आहेत. कारखान्याकडे जास्तीत जास्त ठेकेदारांनी करार करून पुढील हंगाम यशस्वी करणेसाठी सहकार्य करावे असे कारखाना प्रशासनाच्या वतीने आवाहन करणेत येत आहे. तसेच शासनाच्या वतीने ऊस तोडणी यंत्रणास अनुदान जाहीर केलेले असून इच्छुक ऊस उत्पादक सभासद यांनी आपली नांवे शासनाच्या अॅपवरती ऑनलाईन नोंदणी करून त्याची प्रत कारखान्याच्या शेती विभागाकडे कारखाना शिफारशीसाठी नोंद करावी असेही आवाहन याप्रसंगी करणेत आले.
तसेच सदर प्रसंगी कारखाना कार्यस्थळावरील श्रीराम मंदिरामध्ये श्रीराम नवमी निमित्त उत्सव साजरा करणेत आला. त्यावेळी मौजे बाभुळगांव येथील श्री विठ्ठल भजनी मंडळ यांचा भजनाचा कार्यक्रम झाला व दुपारी १२.०० वाजता पुष्पवृष्टी करून कारखाना परिसरातील महिलांकडुन श्रीराम जन्मत्सोवाचा पाळणा म्हणण्याचा कार्यक्रम पार पडला.
सदर प्रसंगी कारखान्याचे संचालक सर्वश्री संभाजी भोसले, कालिदास पाटील, नवनाथ नाईकनवरे, विठ्ठल रणदिवे, प्रविण कोळेकर, सिध्देश्वर बंडगर तज्ञ संचालक दशरथ जाधव, तुकाराम मस्के तर, अशोक घाडगे व कारखान्याचे प्र. कार्यकारी संचालक डी. आर. गायकवाड यांचेसह कारखान्याचे सभासद, ऊस तोडणी वाहतुक ठेकेदार, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

