पांडुरंग सहकारी या कारखान्याचे नामविस्तारीकरण सोहळा उद्या

पंजाबराव डख यांच्या उपस्थितीत भव्य शेतकरी मेळावा 











पंढरपूर --प्रतिनिधी

देशपातळीवरील "सर्वोत्कृष्ठ साखर कारखाना" म्हणून गौरविलेला व महाराष्ट्र शासनाचा " वनश्री व सहकार भूषण" पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला श्री पांडुरंग सहकारी साखर कारखाना लि; श्रीपूर या कारखान्याचे नामविस्तारीकरण सोहळा शुक्रवार दि. ३१/०३/२०२३ रोजी सकाळी ९.३० वा.कारखाना कार्यस्थळ करण्यात येणार आहे अशी माहिती डॉ.यशवंत  कुलकर्णी कार्यकारी संचालक यांनी दिली 

    कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखाना लि. श्रीपूर असा नाम विस्तार करणेत येणार असून या नाम विस्तारीकरण फलकाचे अनावरण कारखान्याचे चेअरमनमा.आ.श्री. प्रशांतराव परिचारक साहेब यांच्या शुभहस्ते तसेच या निमित्ताने आयोजित करणेत आलेल्या भव्य शेतकरी मेळाव्यास सुप्रसिध्द हवामान तज्ञमा.श्री.पंजाबराव डख साहेब हे उपस्थित राहून "हवामान व पिकपाणी परिस्थिती"या विषयावर व्याख्यान देणार आहेत.

तरी सदरच्या सोहळयास सर्व शेतकरी, सभासद व नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन कारखान्याचे कैलास खुळे व्हा.चेअरमन सर्व संचालक मंडळ, सभासद शेतकरी, अधिकारी, युनियन पदाधिकारी आणि कर्मचारी वृंद यांच्या वतीने करण्यात आले आहे

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form