शेतकर्‍यांच्या हक्काचे पाणी बारामतीला वळविण्यात आले असल्याचा आरोप ----केंद्रीय जल शक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत

 


राज्यातील महत्वाचे रखडले जल प्रकल्प, प्रस्तावित प्रकल्प याबाबत उपमुख्यमंत्री फडणवीस,जलसंपदा मंत्री यांच्या बरोबर दिल्ली मध्ये एक बैठक घेणार असून यामध्ये सदर प्रकल्पांचा समग‘ आराखडा बनविला जाणार असल्याची माहिती ही शेखावत यांनी दिली.

पंढरपूर- प्रतिनिधी 

राज्याच्या जल खात्याचा अहवालच बदलून व चुकीची आकडेवारी जाहीर करून शेतकर्‍यांच्या हक्काचे पाणी बारामतीला वळविण्यात आले असल्याचा आरोप केंद्रीय जल शक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी पंढरपूर येथे केला. केंद्र व राज्य सरकारच्या समितीने सर्व्हेक्षण केले असता सदर बाब उघडकीस आली असल्याचे त्यांनी सांगून आम्ही पाण्याची गरज असलेल्या भागात योजना पूर्ण करण्यासाठी निधी देणार असल्याचे जाहीर केले.
केंद्रीय मंत्री शेखावत यांनी आज सोमवारी पुणे ते उजनी धरणा पर्यंत असणार्‍या विविध जलसंपदा विभागाच्या योजनांची हवाई पाहणी केली. यानंतर त्यांनी पंढरीत येवून श्री विठ्ठल रूक्मिणीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी विश्रामगृह येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी खासदार रणजितसिंह निंबाळकर, आमदार व्दय शहाजी पाटील, समाधान आवताडे, माजी आमदार प्रशांत परिचारक आदींसह भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी गजेंद्रसिंह शेखावत यांनी, येथील शेतकर्‍यांवर अन्याय झाला असल्याचा दावा केला. जल खात्याचा अहवालच बदलून व चुकीची आकडेवारी जाहीर करून शेतकर्‍यांच्या हक्काचे पाणी बारामतीला वळविण्यात आले असल्याचा आरोप केला. खासदार निंबाळकर यांनी याबाबत वारंवार मागणी करून सर्व्हेक्षणाची मागणी केली होती. सदर मागणीची दखल घेवून केंद्र व राज्य सरकारच्या समितीने सर्व्हेक्षण केले असता सदर बाब उघडकीस आली आहे. जल खात्याचा अहवालच जाणीपूर्वक बदलून पाणी वळविण्यात आल्याचे सिध्द झाले असल्याची शेखावत यांनी सांगितले. याव्दारे त्यांनी पवार यांच्या कुटुंबियाचे नाव न  घेता पाणी पळविण्याचा आरोप केला.
दरम्यान पावसाचे पाणी चंद्रभागा नदीमधून मोठ्या प्रमाणात वाहून जाते. सदर पाणी आडविण्याबाबत लवादाचा कोणताही आक्षेप नाही. यामुळे नदीमध्ये विविध ठिकाणी मोठे बॅरेजेस बांधून त्याव्दारे वाहून जाणारे पाणी आडविल्यास त्याचा शेतकर्‍यांना शेतीसाठी तसेच पिण्याच्या पाण्यासाठी उपयोग होवू शकतो. तसेच नीरा देवघर धरणाच्या उजव्या कालव्याचे काम अनेक वर्षापासून रखडले आहे. सदर काम  पूर्ण केल्यास पंढरपूरसह सांगोला, माढा, करमाळा आदी तालुक्यातील दुष्काळी भागांना पाणी मिळू शकते. यासाठी राज्य शासनाने सदर योजनेचा प्रस्ताव तयार करून केंद्राकडे पाठवावा अशी सूचना आपण केली आहे. सदर प्रस्ताव येताच तो पूर्ण करण्यासाठी मदत केली जाणार असल्याचे सांगितले.
राज्यातील महत्वाचे रखडले जल प्रकल्प, प्रस्तावित प्रकल्प याबाबत उपमु‘यमंत्री देवेंद्र ङ्फडणवीस, जलसंपदा मंत्री यांच्या बरोबर दि‘ी मध्ये एक बैठक घेणार असून यामध्ये सदर प्रकल्पांचा समग‘ आराखडा बनविला जाणार असल्याची माहिती ही शेखावत यांनी दिली.
दरम्यान कृष्णा भीमा स्थिरीकरण बाबत बोलताना शेखावत यांनी लवादाने याबाबत काही निर्णय दिल्यामुळे सध्या हे काम इतर पध्दतीने कसे केले करता येईल यावर विचार सुरू असल्याचे आश्‍वासन दिले.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form