पंढरपूर प्रतिनिधी-
नवनागापूर (ता. जि. अहमदनगर ) येथील सुनील पांडुरंग सोनावणे, विक्रम अर्जुनराव पातकाळ, वसंत देवराव मुळे यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीस अन्नदानाकरिता ३ लाख रुपये रोख देणगी दिली आहे.
त्यावेळी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे वतीने मंदिरे समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्या हस्ते नवनागापूर (ता. जि. अहमदनगर) येथील सुनील पांडुरंग सोनावणे, विक्रम अर्जुनराव पातकाळ, वसंत देवराव मुळे यांचा सत्कार श्रीची प्रतिमा, उपरणे, श्रीफळ देऊन करण्यात आला. मंदिरे समितीचे कर्मचारी उपस्थित होते.
Tags
सामाजिक
.jpg)