बाळासाहेबांची शिवसेना व भाजप मिळून राज्यात अबकीबार 200 पार करणार आहोत.
पंढरपूर प्रतिनिधी --
राज्यात आणि देशात पंतप्रधान नेरंद्र मोदी यांची लोकप्रियता प्रचंड मोठी आहे. सर्वसामान्य लोक भाजपशी जोडले जात आहेत. शिंदे-फडणवीस सरकारच्या कामावर जनता खूश आहे. त्यामुळे आगामी सर्वच स्थानिक स्वराज्य निवडणूका या भाजप स्वबळावर लढविणार आहे. परंतू, बाळासाहेबांची शिवसेना व भाजप मिळून निवडणूक लढवित दोनशे जागा पार करणार आहे. पुढील सरकार देखील शिंदे-फडणवीस यांचेच असेल, असा ठाम विश्वास भाजप महाविजय 2024 अभियानाचे प्र्रदेश संयोजक आ. श्रीकांत भारतीय यांनी व्यक्त केला.
भारतीय जनता पार्टीच्या महाविजय 2024 अभियानाच्या प्रदेश संयोजक पदी आ. श्रीकांत भारीतीय यांची नुकतीच निवड करण्यात आलेली आहे. या निवडीनंतर भारतीय हे प्रथमच श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाला आले होते. यावेळी ते प्रत्रकारांशी बोलत होते. यावेळी आ. समाधान आवताडे, आ. राम सातपुते, आ. सचिन कल्याणशेट्टी आदीसह भाजप पदाधिकारी उपस्थित होते.
पुढे बोलताना आ. श्रीकांत भारतीय म्हणाले की, भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यावर महाविजय 2024 अभियानाची जबाबदारी दिली आहे. ही जबाबदारी पार पाडण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. सत्याच्या लढ्यासाठी व सामान्यांच्या भल्यासाठी जे जे काही करता येईल, ते ते करण्यासाठी बळ मिळो, म्हणून श्री विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आलो आहे. भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या कामावर जनता खूश आहे. जनतेला राज्यातील शिंदे-फडणवीस यांचे सरकारचे काम मान्य आहे. तर देशाचे पंतप्रधना नरेंद्र मोदी यांच्या कामाचा वेग पाहता त्यांची प्रचंड लोकप्रियता जनसामान्यात कायम आहे. बाळासाहेबांची शिवसेना व भाजप मिळून राज्यात अबकीबार 200 पार करणार आहोत.
त्यामुळेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्था व सर्वच निवडणूकात भाजप मोठ्या फरकाने जिंकून येईल. राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार हे जनताभिमूख सरकार आहे. लोकांचा विश्वास वाढत आहे. त्यामुळे त्यामुळे पुढील सरकार देखील शिंदे-फडणवीस यांचेच असेल, असा ठाम विश्वास आ. भारतीय यांनी व्यक्त केला.
तर पंढरपूर, माळशिसर, माढा तालुक्यातील भाजपात मतभेद दिसून येतात, असे विचारले असता, आ. भारतीय म्हणाले की, तसे काही टोकाचे मतभेद नाहीत. भाजप हा कुटूंब आहे. कुटूंबात मतभेद असतात. मात्र तेही मिटतील, टोकाचे मतभेद अजिबात नाहीत, असे सांगत पदवीधर व शिक्षक मतदार संघात भाजपचे उमेदवार पराभूत झाले असले तरी एवढ्याने भाजप खचणार नसल्याचे आ. भारतीय यांनी सांगीतले.
