“त्या” विद्यार्थ्यांना मिळणार मोफत संगीत शिक्षण कलापिनी संगीत विद्यालयाने ठेवला नविन आदर्श

 

संगीत शिक्षणातील गायन,वादन,हार्मोनियम,तबला,बासरी,
गिटार व नृत्य आदी सर्व विषय एकाच छताखाली मिळत असल्याने पंढरपूर च्या इतिहासात कलापिनी संगीत विद्यालयाचे विशेष आभार व कौतुक केले जात आहे



पंढरपूर :- संगीत कला मानवास मिळालेली देणगी आहे.यासाठी कोणताही मनुष्य कोणत्याही वयात संगीत कला शिकु शकतो.पण बरयाच वेळा शिकण्याची इच्छा असुनही योग्य मार्गदर्शन मिळत नाही तर कधी फी देण्याची क्षमता नसल्याने काहींचे संगीत शिक्षणाची इच्छा ही इच्छाच राहुन जाते.त्यात आणखी भर म्हणजे आजच्या व्यावसायिक परिस्थितीत मोफत शिक्षण संकल्पना बरयापैकी लोप पावत चालली आहे.अशात एखाद्यास शारिरीक अपंगत्व असेल तर काही लोक शिक्षण द्यायलाही तयार होत नाहीत. पण या सर्व परिस्थितीत एक नवा आदर्श समाजासमोर आला आहे.

   मेजर कुणाल गोसावी अंध शाळेच्या ७ विद्यार्थ्यांना संगीत शिक्षणाची आवड होती.हि आवड शाळेच्या वतीने सुप्रसिद्ध तबला वादक व आदर्श संगीत शिक्षक विकास पाटील व कलापिनी चे संस्थापक पं.दादासाहेब पाटील यांच्या समोर मांडली.त्यावेळी त्यांनी तात्काळ कलापिनी संगीत विद्यालयाचे वतीने संगीत शिक्षणाची सोय केली व अंध विद्यार्थी असल्याने एक सामाजिक देण म्हणून त्यांना मोफत संगीत देण्याचेही जाहिर केले.याबद्दल पंढरपूर नगरीत त्यांचे विशेष कौतुक होत आहे.

संगीत शिक्षणातील गायन,वादन,हार्मोनियम,तबला,बासरी,गिटार व नृत्य आदी सर्व विषय एकाच छताखाली मिळत असल्याने पंढरपूर च्या इतिहासात कलापिनी संगीत विद्यालयाचे विशेष आभार व कौतुक केले जात आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form