जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची सर्वात जिव्हाळ्याची व भविष्यात सुरक्षेची हमी असलेली जुनी पेन्शन योजना लागू करा बक्षी समितीने अमान्य केलेल्या वेतनत्रुट्या मान्य करून वेतनत्रुटी दूर करावी, कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करावे या प्रमुख मागणीसह ईतर महत्वाच्या मागण्या मान्य कराव्यात म्हणून महासंघाचे राज्य अध्यक्ष श्री उमेशचंद्र चिलबुले यांच्या लेखी आवाहाना नुसार दिनांक 14 मार्च 2023 पासून देशव्यापी संपात महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ जिल्हा शाखा सोलापूर चे सर्व पदाधिकारी व सदस्य सहभागी होणार आहेत. यासाठी आज मा मुख्यमंत्री श्री एकनाथ जी शिंदे यांना मा निवासी जिल्हाधिकारी श्री नागेश पाटील साहेब सोलापूर यांचे मार्फत संपाची नोटीस देण्यात आली .
तर नोटीसीची एक प्रत सोलापूर जिल्हा परिषदेचे मा प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री संदीप कोहिणकर यांना संपाची नोटीस देण्यात आली. सदर प्रसंगी दिव्यांग कर्मचारी संघटनेचे लक्ष्मण वंजारी, महासंघाचे विभागीय सचिव दिनेश बनसोडे, ज्येष्ठ नेते रमाकांत साळुंखे, जिल्हा अध्यक्ष राजेश देशपांडे, मानद जिल्हा अध्यक्ष सचिन सोनकांबळे,मानद उपाध्यक्ष अविनाश गोडसे,जिल्हा कार्याध्यक्ष सचिन मायनाळ,जिल्हा उपाध्यक्ष आनंद साठे, सचिव प्रमोद धावड, संयुक्त सचिव सुरेश राठोड,ग्रामसेवक युनियन चे लक्ष्मण गलगुंडे, शरद भुजबळ,आरोग्य कर्मचारी युनियन चे निर्मल पवार,कंत्राटी कर्मचारी संघटनेचे सचिन जाधव महासंघाचे पंढरपूर तालुका अध्यक्ष धन्याकुमार काळे,महासंघाचे मंगळवेढा तालुका अध्यक्ष सचिन येडशे,महासंघाचे सांगोला तालुका अध्यक्ष परमेश्वर नागणे ई उपस्थित हो

